Header Ads Widget


त्रिमूर्ती पब्लिक स्कूल शेवगांव येथे आंतररराष्ट्रीय योग दिवस साजरा योगशिक्षक सुरेश बोरुडे पाटील यांनी दिले विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण


प्रतिनिधी शेवगांव अविनाश देशमुख 9960051755 - दिनांक 21/06/2024 वार शुक्रवार आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला आपल्या शरीराकडे लक्ष दयायला वेळ नाही त्यामुळे अकाली बी. पी. शुगर कॅन्सर गंभीर आजार मानवास जडतात याला छेद देण्यासाठी आपल्या ऐतिहासिक आणि परंपरागत विकसित अशा योग विद्या मुळे आजची पीडी सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगु शकतात यां पार्श्वभूमीवर  आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन  ञिमुर्ती पब्लिक स्कूल येथे  ९ वे आंतरराष्ट्रीय  योगदिना निमित्त योगशिक्षक तथा योगप्रचारक सुरेश पाटील यांनी  व्याख्यान व प्रात्यक्षिक योगा करुन दाखविले..


प्रथम प्रार्थना नंतर सुक्ष्म  व्यायाम यात मानेची, खांदेचे, पायाचे  सुक्ष्म व्यायाम  श्वासवर नियञंण ठेवणे, शरीरातील हालचाली . मुळे शरीरांत रक्त संचार चांगला होतो, पाठीच्या  आजारासाठी  मकरासन, मर्कटासन, भुंजगासन, ञिकट भुंजगाअसान या सारखे  आसन केले पाहिजे.. पोटातील चरबी, कोलस्टाल, गॅसेस,साठी   पवनमूक्तासन,केले पाहिजे   मूंडकासन, वक्रासन असे आसान केले. मधूमेह सारखे दुर्धर आजार बरे होतात.


कपालभाति, व अनुलोविलोम हे प्राणायाम केले तर ७२ कोटी  ७२ हजार १०७२ नाड्या  शुध्द होतात.शरीरात ब्लाॅकेज, राहत  नाहीत.  प्राणायाममुळे अनेक लाभ  मिळतात.,, याप्रसंगी ञिमुर्ति पब्लीक स्कुल संकुलचे मानद विश्वस्त  बाळासाहेब कोकरे ,तसेच प्राचार्य  काळे सर व  विज्ञान व महाविद्यालयचे  जगताप मॅडम व सर्व कर्मचारी उपस्थित होते


ताजा कलम

भारतीय संस्कृतीच्या समृद्ध आरश्यात योग विद्या आयुर्वेद याला अनन्य साधारण महत्व आहे पाश्चिमात्य देशातील नागरिक अनुकरन करून हेल्दी लाईफ जगत आहे याचा विसर भारतीयांनाच पडला आहे त्यामुळे कोट्यावधी भारतीय गंभीर आजारांना बळी पडत आहेत यासाठी  योगाचा मार्ग अवलंबुन जीवन निरोगी आणि निरामय बनवावे असा संदेश यातुन दिला.

अविनाश देशमुख शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

Post a Comment

0 Comments

|