Header Ads Widget


तीन दिवसीय योग प्रशिक्षणात भाग घेऊन योगासनाची प्रात्यक्षिके केली

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय व शारदा कन्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी तीन दिवसीय योग प्रशिक्षणात भाग घेऊन योगासनाची प्रात्यक्षिके केली. दिनांक १९ जून ते २१ जून पर्यंत तीन दिवस शिक्षकांनी रोज सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत एक तास योगासने केलीत.विशेषतः प्रत्येक शिक्षकांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके केली.योगशिक्षक कैलास भावसार व महेंद्र सोनार यांनी शिक्षकांना योगाचे धडे दिले.योगा कसा करावा याबाबत विस्तृत माहिती दिली.विशेष म्हणजे तीन दिवस योग शिबिरात स्वतः संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव सहभागी झाले होते.त्यासोबत वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील व शारदा कन्या विद्यालयातील पदाधिकारी देखील सहभागी झालेले होते.प्राध्यापक संजय जाधव यांनी योगा केल्याने आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे होतात याबाबत माहिती दिली.२१ जून रोजी क्रीडा शिक्षक तेलगोटे ए.एच.यांनी विद्यार्थ्यांना योगासने व योगा बाबत योग दिनानिमित्त विस्तृत माहिती दिली.

Post a Comment

0 Comments

|