Header Ads Widget


शहादा शहरातील लावण्यात आलेले सर्व होर्डिंग व मोठे बॅनर बाबत चौकशी केली जाईल.बेकायदेशीर असलेले होर्डिंग व बॅनर काढण्यात येतील..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरात नगरपालिका हद्दीत अनेक होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.मुंबईच्या धरतीवर अथवा इतर मोठ्या शहरांपेक्षा होर्डिंग जरी लहान असले तरी अनाधिकृत होर्डिंग काढणे आवश्यक आहे.याबाबतीत नगरपालिका प्रशासन लवकरच होर्डिंग बाबत कायदेशीर पाऊल उचलणार आहे.मुंबईला भव्यकाय अशा होर्डिंगने निष्पापांचे बळी घेतले आहेत.नंतर महानगरमालिका प्रशासनाला जाग आल्यावर कारवाई सुरू केली आहे.शहादा शहरात देखील ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.साधारणता २० ते २५ होर्डिंग आहेत.त्यात अधिकृतपणे किती होर्डिंगांना नगरपालिका प्रशासनाची परवानगी आहे? त्यांची मुदत किती होती?त्यात किती अनाधिकृत होर्डिंग मोठे फलक मोठ्या कमानी लावल्या आहेत?याची चौकशी होणे अपेक्षित आहे.होर्डिंग मोठे नसले तरी काही होर्डिंग जीव घेणे ठरवू शकतात.कारण अनेक होर्डिंगांना लोखंडी खांब तसेच लोखंडी इंगल लावलेले आहेत.काही होर्डिंग गेल्या चार पाच वर्षापासून लावलेले आहेत ते जीर्ण झाले असतील तर धोकेदायक ठरू शकतात.या सर्वांना नगरपालिकेची परवानगी आहे का?त्यांनी नियमानुसार कर भरला आहे का?हा संशोधनाचा विषय आहे.राज्यात सर्वत्र आता बेकायदेशीर होर्डिंग काढायला सुरुवात केलेली आहे.नंदुरबार जिल्ह्यात देखील लवकरच मोहीम सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. शहादा शहरात बसस्थानक आवारात बस स्थानक परिसरात जनता चौक चार रस्ता काशिनाथ मार्केट अहिंसा चौक दोंडाईचा रस्त्यावरील भगवा चौक स्टेट बँक चौक परिसरात लहान मोठे होर्डिंग लावलेले आहेत.एखाद्या ठिकाणी होर्डिंग अयोग्य असल्यास पालिका प्रशासन असे होल्डिंग काढून घेणार आहेत.काही वजनदार बॅनर लावण्यात आलेले आहेत ते देखील धोकेदायक ठरू शकतात.काही होर्डिंग खाजगी इमारतींवर लावण्यात आलेले आहेत.या सर्व बाबतीत नगरपालिका प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे.पावसाळ्यापूर्वी मोठे वादळ येत असतात त्यापूर्वीच बेकायदेशीर होर्डिंग काढणे बाबत मोहीम राबवावी अशी मागणी आहे.लहान-मोठे व्यवसायिक हातगाडी वाले मोठ्या बॅनर खाली किंवा होर्डिंग खाली व्यवसाय करतात.सर्वाधिक मोठे होर्डिंग शहादा बस स्थानक आवारात लावण्यात आलेले आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार करार केलेला असतो.मात्र त्यांच्या करार आहे की संपला आहे याची चौकशी आगार प्रमुखांनी करणे गरजेचे आहे. शहादा नगरपालिका प्रशासन होर्डिंग व मोठे बॅनर बाबत लवकरच मोहीम सुरू करणार आहेत.जिल्हाधिकाऱ्यांची देखील आदेश निघण्याची शक्यता आहे.शहरातील लावण्यात आलेले सर्व होर्डिंग व मोठे बॅनर बाबत चौकशी केली जाईल.बेकायदेशीर असलेले होर्डिंग व बॅनर काढण्यात येतील.संबंधितांना आधी नगरपालिका तर्फे नोटीसा देण्यात येतील-दिनेश सिनारे-मुख्याधिकारी शहादा नगरपालिका.

Post a Comment

0 Comments

|