Header Ads Widget


नंदुरबार जिल्हा बनतोय लाचखोरीचा अड्डा; जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात....

 



नंदुरबार प्रतिनिधी/ संदिप कोकणी: नंदुरबार जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांचे लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त वाढत असून यांना अभय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तर मिळत नाही ना? अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस कार्यवाही होत आहे तरीदेखील लाच घेणे काही थांबत नाही आहे?असा सवाल देखील सर्वसामान्यांमध्ये होत आहे ,नवापूर शहरात जिल्हा परिषदेची शाळा बंद असल्याने 75मिटरवर एका हॉटेल मध्ये परमिट रूम व बियरबार सुरू करण्यासाठी ना हरकत तसेच आरटीई मान्यता वर्धित करून देण्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून 50 हजाराची लाच घेताना नंदुरबारचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतिष सुरेश चौधरी यांना नाशिक येथील लाच लुचपत विभागानेरंगेहाथ अटक केल्याने नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. ८२६, सीटी सर्वे क्र.६२४, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु

करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूम व बियर बार परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग कडून ही शाळा बंद असल्या बाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे कामाच्या बदल्यात बक्षीस म्हणून नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी रा. शांतीनगर, वाघेश्वरी मंदिरा, नंदुरबार, मु.रा. प्लॉट नंबर ८, गट नंबर ३५, मुक्ताईनगर, तालुका जिल्हा-जळगाव यांनी ५० हजाराची मागणी करुन आज १५ मे २०२४ रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात ५० हजार लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून याप्रकरणी सतिष सुरेश चौधरी यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पो.ना. गणेश निंबाळकर यांच्या पथकाने केली. या कारवाई नंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र अवघ्या काही दिवसापूर्वी नवापूर तहसील कार्यालय नंतर नवापूर पोलीस स्टेशन व आता शिक्षण विभाग असे मोठमोठे अधिकारी दिवसेंदिवस लाच घेतांना आढळत आहेत. आता अजून कोणत्या कार्यालयाच्या कोणत्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे...

Post a Comment

0 Comments

|