Header Ads Widget


आपत्ती व्यवस्थापन आराखडा सर्व विभागांनी त्वरीत सादर करावा -मनीषा खत्री(जिल्हाधिकारी नंदुरबार)

 



नंदुरबार प्रतिनिधी/ संदिप कोकणी:
सर्व शासकीय विभागांनी स्थानिक स्त्रोत, हुशारी वापरुन आपत्ती व्यवस्थापन आराखरा तयार करावा व प्रशासनास त्वरीत सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आज मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हापरिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री पुढे बोलतांना म्हणाल्या, सर्व विभागांनी त्यांच्या कार्य क्षेत्रातील कामांचा सर्वे करुन जी कामे दुरुस्तीची असतील ती त्वरीत करुन घ्यावीत. आपत्ती व्यवस्थापन हा सर्वांचा विषय असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे, ज्या विभागाचे आराखडे प्रलंबित असतील त्यांनी ते त्वरीत जिल्हा प्रशासनाला सादर करावेत. आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या काळात व आपत्ती काळानंतर संबंधित प्रत्येक विभागाने नियोजनाप्रमाणे तत्काळ प्रतिसाद द्यावा. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारपणावर वेळीच औषधोपचार करण्यासाठी आवश्यक त्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावा. सर्व मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रणा तपासून घ्याव्यात. पावसाळ्याच्या कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यकतेनुसार सूचना देण्यात येतील. सर्वांनी मुख्यालयी थांबावे व आपत्ती विषयक कामकाज करतांना योग्य समन्वयठेवावा.उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे यांनी यावेळी कोणत्या विभागाने आपत्ती व्यवस्थापना विषयी काय नियोजन केले याचा आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments

|