Header Ads Widget


कै.प्रतिकेश विश्वनाथ पाटील या मयत विद्यार्थ्यांच्या परिवाराला विम्याचे धनादेश देण्यात आला...

 


     


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी कै.प्रतिकेश विश्वनाथ पाटील याचां गेल्या काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यु झाला होता. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी सामुहिक सुरक्षा अपघात विमा काढलेला असतो. विद्यार्थी हे नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेत असतात त्यावेळीच विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात येत असतो त्या अनुशंगाने शिक्षण घेत असतांना एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघाती किंवा काही कारणास्तव मृत्यु झाला तर त्याचा कुटुंबियाना आर्थिक मदत केली जाते. त्याप्रमाणे महाविद्यालयाने विद्यापीठाद्वारे सदर विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा काढलेला होता. त्या अनुशंगाने द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा अंधेरी ईस्ट, मुंबई, तर्फे पाच लाख (5,00,000) रु चा धनादेश तर मा.कुलगुरू महोदय वैद्यकीय निधीतून मयत विद्यार्थ्यांच्या वारसदार यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य रक्कम दहा हजार (10,000) रु चा धनादेश असे एकूण पाच लाख दहा हजार (5,10,000) रु चा धनादेश महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला होता. त्यानंतर सदर धनादेश पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांच्या हस्ते सदर मयत विद्यार्थ्यांचे पालक वडिल विश्वनाथ गोविंद पाटील व आई गायत्री विश्वनाथ पाटील यांच्याकड़े धनादेश देण्यात आला. यावेळी विमा कंपनीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाने सहकार्य केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे सहकार्य लाभले. धनादेश सुपूर्द करण्याच्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमृता पाटील, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल लोहारे आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

|