Header Ads Widget


नंदुरबार येथे विना परवाना औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाई श्रीमती जमादार


प्रतिनिधी : नंदुरबार 
अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात विना परवाना औषध विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्रीमती अ. वि. जमादार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यातील मंगळ बाजार परिसरातील में. हरिश ट्रेडर्स या जनरल स्टोअर्समध्ये ऑलोपॅथिक औषधी क्रीम्स विना परवाना विक्री करत असल्याने या ठिकाणी छापा टाकून तपासणी करुन रुपये 23 हजार 448 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असून विना परवाना औषध विक्रीची कारवाई नुकतीच करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी विना परवाना औषध विक्री अथवा साठवणूक करु नये, असे करतांना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध औषधे व सौदंर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती जमादार यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.

ही कारवाई सहायक आयुक्त अश्विनी जमादार, सह आयुक्त मिलींद पाटील, यांच्या मार्गदर्शनाने औषध निरिक्षक कि.सु. देशमुख, एस.बी. मुळे, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|