Header Ads Widget


वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ मध्ये गुणवत्ता यादीत आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता आठवीचे चार विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ मध्ये गुणवत्ता यादीत आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत इयत्ता आठवीतील १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात स्वामी दीपक गुरव मनीष मनोहर जाधव व हुजैफा इमरान खाटीक गुणवत्ता यादीत आलेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय परिवारातर्फे कौतुक करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांना पी.डी.शिंदे एच.ए.वाल्हे एन.ए.कुंभार व भावेश खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक महेंद्र मोरे उपमुख्याध्यापक जे.एम.पाटील पर्यवेक्षक ए.डी.खेडकर व ए.ए. खान यांचे देखील बहुमोल मार्गदर्शन लाभले त्यांनी देखील कौतुक केले.

Post a Comment

0 Comments

|