Header Ads Widget


मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रे करूंना मेंदूज्वराची लस देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथे गरीब नवाज कॉलनीला लागून असलेल्या नगरपालिका रुग्णालयात दिनांक १६ मे रोजी सकाळी १० वाजता शहादा येथून मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रे करूंना मेंदूज्वराची लस देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.या कार्यक्रमाला मुक्तहिद मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अजहर पठाण मुन्ना कादरी मुन्ना टेलर माजी उपनगराध्यक्ष नासिर पठाण सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेख नुरा रजीओउद्दीन अमीनुद्दीन राजू शेख जुबेर पठाण बाबा डिश वाले सह मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.साधारणतः दरवर्षी बकराईद हा सण ज्या महिन्यात येतो त्या महिन्यात हज यात्रेला सुरुवात होत असते. देशातून लाखो हजयात्री हजला जात असतात.जीवनातून एकदा तरी हज यात्रा कराल पाहिजे अशी भावना मुस्लिम समाजात आहे.शहादा शहरातून यावर्षी १३१ हज यात्रेकरू हजला जात आहेत. हजय्यात्रेकरूला शासकीय सर्व कागदपत्र तसेच आवश्यक वस्तू तसेच लसीकरण करण्यासाठी शहादा येथील मुक्तहीद मुस्लिम संघटना कार्य करत असतात.त्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असते.हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूला प्रवासात कोणत्याही प्रकारच्या त्रास होऊ नये सर्दी ताप खोकला पासून बचाव व्हावा म्हणून एकत्रित रित्या मेंदूज्वरची लस दिली जाते.सदरची लस जिल्हा रुग्णालयात दिली जाते मात्र यावर्षी असलेला तीव्र उन्हाळा व वयोवृद्ध व्यक्तींना अजय यात्रे करून ना त्रास होऊ नये म्हणून शहादा येथील मुक्त हित मुस्लिम संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांना निवेदन देऊन लसीकरण शहादा येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात करण्याची सोय उपलब्ध व्हावी अशी मागणी केली होती.या संदर्भात दैनिक स्वतंत्र भारत वृत्त देखील प्रकाशित केले होते त्याची दखल म्हणून शहादा येथेच लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली.दिनांक १६ मे रोजी १३१ हजियात्रेकरूंना लसीकरण करण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम संघटनेची मागणी मान्य करून हज यात्रे करूंना शहादा येथेच लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.देशाच्या हितासाठी व देशाच्या प्रगतीसाठी सुख शांतीसाठी आम्ही परमेश्वर जवळ प्रार्थना करणार आहोत-शेख रफिक नुरा-सदस्य मुक्तहिद संघटना शहादा

Post a Comment

0 Comments

|