Header Ads Widget


गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे मुख्य प्रवेश द्वाराचे कुलुप तोडून दान पेटतील रोक्कड रक्कम घेत चोरी;चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस प्रशासना पुढे आवाहन...

 

   


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरास लागुन लोणखेडा बायपास रस्त्या लगत साईबाबा नगर भागातील गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे मुख्य प्रवेश द्वाराचे कुलुप तोडून दान पेटतील रोक्कड रक्कम घेत चोरी करतांना सीसीटीव्ही कॅमेरेत फोटो दिसु नये म्हणून चोरट्यांनी लगतच स्टोर रुमचे कडीकोयंडा तोडून रुम मधील सीसीटीव्ही फुटेज बाँक्स वायरींग काढुन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटणा आज(दिं १५)बुधवार पहाटेचा सुमारास घडली आहे.याघटणे बाबत पोलीसांनी माहिती मिळताच ठाणे अंमलदार यानी घटणा स्थळी पोहचुन माहिती घेतली आहे. अज्ञात चोरटय़ांन विरोध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील देवदेवतांची मंदिरात होणारी चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस प्रशासना पुढे आवाहन आहे. 

 शहदा शहरातील देवदेवतांच्या मंदिरातील प्रवेश द्वारा चे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून दान पेटीतून रोकड व सीसीटीव्ही कॅमेरे फुटेचा बाँक्स अज्ञात चोरट्याने कडून लंपास करण्याची घटणा आठवडा भरात चोथी आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास बायपास रस्त्या लगत असलेल्या गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे कुलूप तोडून दान पेटतील रोख. दहा हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम व लगतचा स्टोरेज रुमचे कडीकोयंडा तोडून मधील फुटेज बाँक्स चोरीस नेल्याची घटणा घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे पाच वाजेच्या अगोदर बायपास रस्त्या लगत असलेल्या गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे मुख्य प्रवेश द्वारा लावलेले कुलुप लोखंडी सळईन वाकवित काही अज्ञात चोरांनी मंदीरात प्रवेश केला आहे. मुख्य महादेवाचे मुर्तीची गाभारा बाहेर दान पेटी लावलेली आहे. यात येणारे भाविक भक्त आपल्या यथाशक्ती प्रमाणे दान दानपेटीत टाकत असतात.

  अज्ञात चोरट्यांनी दान पेटी फोडत त्यातील नोटा गोळा करत पेटतील एक-दोन_पाच रुपाचे नाणे तेथेच सोडुन चिल्लर अस्त व्यस्त केली त्यानंतर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात फोटो येऊ नये म्हणून चोरट्यांनी मंदीरास लागुन स्टोर रुमचे कुलुप तोडत आत शिरुन सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज बाँक्सचा वायरींग स्क्रुचावीचा वापर करत वायरींग काढत बाँक्स लंपास केला आहे. गोकर्णेश्वर महादेव मंदिर हे बायपास रस्त्या लगत आहे रस्त्यावर दिवसरात्र वर्दळीच्या सुरु असते पोलीस गस्त असते.लोकसभा निवडणूक बंदोबस्त करीता लागले होते याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातुन दान पेटतील रोको रक्कम चोरीस नेल्याने आरोपींन अटक करण्याचे आवाहन उभे ठाकले आहे. मंदीरातील चोरीची पंधरा दिवसात चोथी घटणा शहादा शहरातील कुकडेल भागातील पुरातन रामेश्वर महादेव मंदिर, संत श्री गजानन महाराज मंदिर, साईबाबा नगरातील श्री गुरुदत्त मंदिर व आज गोकर्णेश्वर महादेव मंदिर येथे चोरीची घटणा घडली आहे. संत श्री गजानन महाराज मंदिराचा तळ घरात सोमवारी भर दुपारी बारा चा सुमारास अज्ञात चोरटय़ांनी आत प्रवेश करून चोरी केली आहे... शहरातील देवदेवतांचे मंदिरतुन दान पेटीतून चोरी होण्याचा घटणा घडत आहे. चोरांचे फोटो उपलब्ध व्हावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. चोरी करणारे चोर आता रोकडसह सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज बाँक्सची चोरी करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या आरोपीतांना पकडण्याची हातसचोटी असल्याने गत दोन वर्षापासून अनेक गुन्हे उघडकीस आले आहे. मंदीरातील चोरीचा घटणेतील आरोपीतांना अटक करण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.

Post a Comment

0 Comments

|