Header Ads Widget


गोमाई नदीवरील पुलाची दुरुस्ती करणे कामी जड वाहणास पुलावरून वाहतूकीस बंद केले असताना प्रशासनाचे नियमांची पायमल्ली करून महिनाभरा पासून जड वाहाणे सर्रास वापर सुरू...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील डामरखेडा गावालगत गोमाई नदीवरील पुलाची क्षमता कमी झाली आहे. पुलाची परिस्थिती कालबाह्य झाल्याने मोठी दुर्घटना टाळावी यासाठी संबधीत विभागाने दोन महिने आगोदर पुलाची दुरुस्ती करणे कामी जड वाहणास पुलावरून वाहतूकीस बंद केले असताना प्रशासनाचे नियमांची पायमल्ली करून महिनाभरा पासून जड वाहाणे सर्रास वापर केला जातो आहे. जड वाहण चालक एवढ्यावरच न थांबता पुला लगत लावलेल्या मातीची गोणी व लोखंडी बॅरगेटींग तोडून वाहन जात आहे.

     विसरवाडी ते सेंधवा महामार्गावर डामरखेडा प्रकाशा दरम्यान गोमाई नदीवर इंग्रज काळातील पूल बांधकाम झालेले आहे सदरचे बांधकाम ५० वर्षापेक्षा जास्त झाल्याने पुलाची परिस्थिती खराब झालेली आहे. पुलावरून जड वाहने चालवण्या सारखी पुलाची परिस्थिती नाही. पुलावरील ठिकठिकाणी असलेले खड्डे, पिलरला गेलेले तडे असल्याने वारंवार पुलावरून जड वाहन चालवल्याने हा पूल केव्हाही पडू शकतो? कालबाह्य झालेल्या पुलाची दुरुस्ती करिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गत दोन महिने अगोदर दुरुस्तीच्या कामासाठी निविदा काढत रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्याच्या निर्णय घेत प्रकाशा व शहादा शहराच्या लगत पाडळदा रस्त्या कडून जड वाहनांची वळण व्यवस्था करण्यात आलेली आहे डामरखेडा लगत गोमाई नदीवर नवीन पुलाच्या बांधकाम सुरू आहे. रस्ते विकास महामंडळाकडून पर्यायी पुलाची निर्मिती होईपर्यंत प्रकाशा व शहादा येथून जड वाहनांची वळण करण्यात आली आहे असे असतानाही मध्यंतरीच्या दिवसात परराज्यातून येणाऱ्या जाणारा जड वाहन रात्री बे रात्रीच्या सुमारास वाहन चालक सर्रासपणे मार्गस्थ होत होते . शहादा प्रकाशा येथे काही वळण रस्त्यावर लोखंडी बॅरगेटींग लावण्यात आले आहेत. जड वाहन चालक लोखंडी बेरगेटिंग बाजूला सरकवित तर काहींनी लोखंडी बॅरगेटींगला जोरदार धक्का देत वाहन मार्गस्थ करतात. कालबाह्य पुलावरून जड वाहन बंदी असताना देखील जड वाहन जात येत असल्याने तसेच या वाहनांना जाण्या येण्यास कोण प्रोत्साहित करते? असा प्रश्न सामान्य जनते मध्ये चर्चिला जावू लागल्याने संबंधित ठेकेदाराने पुलाच्या दोघ बाजूला मातीच्या गोण्या भरून लावण्यात आल्या होत्या त्यात फक्त दुचाकी व लहान चार चाकी वाहने निघतील असा एक भाग मोकळा ठेवण्यात आलेला होता यामुळे लहान वाहन चालकांना या रस्त्याने मार्गस्थ होता येईल गोमाई नदीचां पूला वर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. पुलाच्या खाली असलेल्या पिलरला देखील तडे गेल्याने मोठी दुर्घटना होऊ नये करीता दुरुस्तीच्या काम सुरू आहे. असे असताना देखील मध्यरात्री पहाटेपर्यंत अनेक जड वाहन मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत आहेत. जड वाहन चालक या पुलाच्या दोघा बाजूस लावलेल्या मातीच्या गोण्यांना सर्रास ठोस मारत, लोकांचा हित करीता तसेच कालबाह्य पुलावर मोठी दुर्घटना टळावी यासाठी जड वाहणे वळण रस्ताने फिरविले असतानांच देखील अनेक जड वाहण चालक स्वावताचा जीवाची पर्वा न करता तसेच इतरांना होणारा नाहक त्रासाचा विचाराची तसदी न घेता जड वाहन चालक भरधाव वेगाने वाहन नेत आहेत. 

गोमाई नदीवरील पूल कालबाह्य झाल्याने अवजड वाहनांना बंद रस्ता करण्यात आला असल्याच्या फलक प्रकाशा व शहादा येथे लावलेले असताना देखील तसेच वळण रस्ता वापर करणारा मार्गदर्शक फलक असताना देखील जड वाहन चालक या अवजडवान बंद फलकाच्या नियमांचे पालन न करता बॅरिटींगला बाजूला सरकवित वाहन पुलावरून सर्रास नेत आहेत. महाराष्ट्रतून मध्ये प्रदेश व गुजरात राज्याला जोडणारा शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेडा लगत गोमाई नदीवरील पुलाची जड वाहण पेलण्याची क्षमता कमी झाली आहे. कालबाह्य पुलाचे दुरुस्ती काम संथ गतीने सुरु आहे. पुलाचे दुरुस्तीचे काम पुर्ण होऊन जड वाहण चालण्यास पुल तयार होत नाही तोपर्यंत यारस्तावरुन जड वाहाणांस सक्तीतीची बंद करावे.

Post a Comment

0 Comments

|