Header Ads Widget


आई म्हाळसा देवी मंदिरात आठ वर्षीय मुलीची साखर तुला करण्यात येवून नवस पूर्ण....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरातील आई म्हाळसा देवी मंदिरात आठ वर्षीय मुलीची साखर तुला करण्यात येवून नवस पूर्ण करण्यात आला. जानेवारी महिन्यात लावण्या राकेश चौधरी या मुली स 107 डिग्री ताप होता . तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु डॉक्टरांनी लावण्या दुरुस्त होईल याची शाश्वती दिली नव्हती. लागलीच लावण्याची आजी-आजोबा यांनी म्हाळसा मंदिरात जाऊन मातेला प्रार्थना केली. व तिच्या ताप उतरवण्यासाठी साखडे घातले. एका तासात लावण्याच्या ताप उतरला व तिची प्रकृती सुधारण्यास मदत झाल्याचे तिचे वडील राकेश चौधरी यांनी सांगितले.डोंगरगाव रोड लगत वसाहती मध्ये आई म्हाळसा देवी चे मंदिर आहे. म्हाळसादेवी मंदिर जागृत असल्याची ख्याती सर्व दूर पसरली आहे. बारा बलुतेदारांचे कुलदैवत असलेली म्हाळसा देवीचे मंदिर जिल्ह्यातील शहादे शहरात असल्याने भाविकांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण झाले असून नवरात्र, चैत्र नवरात्र, यावेळी भाविक आपल्या कुलदेवतेचा दर्शनासाठी, जाऊळ उतरविण्यासाठी , आरती लावण्या साठी भेट देत असतात . तसेच सोमवार, मंगळवार, शुक्रवार परिसरातील महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने भेट देत असतात. काही भाविक आपली मानलेली मानता अथवा नवस फेडत असतात. मंदिर परिसरात दवाखाने आहेत त्यामुळे भाविकांची वर्दळ सुरूच असते. लहान मुलांचे देखील दवाखाने आहेत त्यामुळे माता, भगिनी लहान बाळांना घेवून मंदिरात येत असतात. नुकतेच मोड येथील दाम्पत्य राकेश अशोक चौधरी व दीपिका अशोक चौधरी यांनी त्यांच्या आठ वर्षाची मुलगी लावण्या हीचा साठी मानलेला नवस साखर तुला करून पूर्ण केला. मुलीचा नवस पूर्ण करण्यासाठी तीचे आजी आजोबा वासुदेव सखाराम पाटील व सुनंदा सखाराम पाटील यांनी पुढाकार घेतला. चौधरी व पाटील कुटुंब एकत्रित येवून लावण्याचा साखर तुलेचा नवस पूर्ण केला . लावण्य देखील अगदी हसत खेळत तुला करण्यासाठी तुला पात्रामध्ये बसली होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद हा वाखनण्याजोगा होता. मातेने मानता पूर्ण केली व आमच्या मुलीला जीवनदान दिल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. मंदिराचे पुजारी विलास रेड्डी यांच्या सुश्राव्य वाणीतून व शुध्द मंत्रोपचरांणे तुला करण्यात येवून नवस पूर्ण केला गेला यावेळी मंदिराचे प्रा गणेश नारायण सोनवणे, गणेश केशवराव सोनवणे, सेवेकरी राजू भावसार सह भाविक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|