Header Ads Widget


शहादा येथील वरिष्ठ महाविद्यालयात मतदान जनजागृती केली....

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुका एज्यु.सोसायटी अँड को-ऑप.एज्युकेशनल सोसायटी लिमिटेड संचलित, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शहादा आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च & डेव्हलपमेंट या तीनही महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या एककाच्या वतीने कै. डॉ. विश्रामकाका शैक्षणिक संकुलात दि. 13 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी सेल्फी पॉइंट चा माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.जे. पाटील, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदिप मराठे, आय.एम.आर.डी. चे संचालक डॉ अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना एकक चे कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश भुसारे, प्रा. दीपक वळवी यांनी आयोजित केला होता.



Post a Comment

0 Comments

|