Header Ads Widget


सोशल मीडियाच्या आधार घेत समाज बांधवांच्या असलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर मतदानाचे आवाहन...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाच्या हक्क बजवावा यासाठी शासन पातळीवरून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे त्यात भर म्हणून आपल्या समाज बांधवांनी शंभर टक्के मतदानात सहभाग नोंदवावा यासाठी विविध समाज बांधवांकडून सोशल मीडियाच्या आधार घेत समाज बांधवांच्या असलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. जन माणसांमध्ये या समाजानी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे व या निर्णयाचे स्वागत देखील होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या मेसेज मध्ये समाजाकडून घेतलेल्या उपक्रमाचे नाव " मतदान अभियान " असून यात त्यांनी घेतलेले निर्णय वाखाण्याजोगे आहेत ऊन असल्याने सकाळी ९ वाजेचा आत पुर्ण परीवाराला सोबत घेऊन मतदान करून येणे, आपल्या परिवाराचा फोटो समजाचा ग्रुप वर टाकने , समजातील किती जणांचे मतदान झाले ते फोन करून विचारणे या कामी आढावा २ वाजेला अध्यक्ष व कार्यकारणी चा ऑफिस ला बसुन घेणे, ज्यांचे मतदान राहिले आहे त्यांना विनंती करणे, एकुण किती मतदान होते आणि किती झाले याची रात्री आकडेवारी समाजाचा ग्रुप वर टाकणे   दिवसभरात कोणी मतदान केले नाही व त्याचे कारण काय त्याचीही यादी ग्रुप वर टाकणे , समाजाचे १००% मतदान व्हावे असा संकल्प केला आहे . अशा निर्णयामुळे मतदानाच्या टक्केवारीत साहजिकच वाढ होईल. मतदान करणे आवश्यक आहे मतदान जनजागृती यावर भर दिला जात असल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे व अशाच प्रकारची संकल्पना सर्व समाजातील घटकांनी व जनतेने देखील राबवावी अशी देखील जनमानसामध्ये प्रतिक्रिया उमटत आहे.संकल्पना त्यांच्या कोणाच्या विचारातून आली त्यांचे कौतुकच होत असल्याने सर्वसामान्य या प्रकारची उपक्रम राबवावे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे

Post a Comment

0 Comments

|