Header Ads Widget


म्हसावद पोलिस ठाण्यांतर्गत लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावातून पथसंचलन केले...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे: शहादा तालुक्यातील म्हसावद पोलिस ठाण्यांतर्गत लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावातून पथसंचलन केले. म्हसावद पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सीआयएसएफ व बीएसएफच्या जवानांनी यात सहभाग नोंदवला.पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद गावात पोलिस स्टेशन येथून मच्छी बाजार, बाजार चौक, बहिरोम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साई बाबा मंदिर, सरदार पटेल चौक, धनगर गल्ली, अहिल्याबाई पुतळा, ग्रामीण रुग्णालय म्हसावद, आंबाजीमाता मंदिर व शेवट पोलिस ठाणे येथे करण्यात आला. रुटमार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, सीआयएसएफचे २ अधिकारी व ६० जवान, बीएसएफचे २ अधिकारी व ४८ जवान, म्हसावद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पीएसआय किशोर बडगुजर यांच्यासह १४ पोलिस अंमलदार, १४ होमगार्ड सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता सुरू झालेला रुटमार्च ११ वाजेला समाप्त झाला. रूट मार्चबाबत सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आलेला आहे.



Post a Comment

0 Comments

|