Header Ads Widget


महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटख्यासह ४६ हजार ६५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरानजीक असलेल्या उंटावद गावाजवळ तिखोरा ते लोणखेडा रस्त्यावर शनीवारी दुपारी १६ हजार ६५४ रुपयांचा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा,पाच हजार रुपये किंमतीचा अँड्रॉइड मोबाईल व एक विना नंबर प्लेट मोटारसायकल असा एकूण ४६ हजार ६५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका विरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरानजीक असलेल्या उंटावद गावा जवळील तिखोरा ते लोणखेडा रस्त्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयित फिरोज आरिफ धनानी (वय ३४)रा. गरीब नवाज कॉलनी शहादा हा राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास हानिकारक असलेला विमल गुटखा तंबाखू, पानमसाला अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगतांना मिळून आला. पोलीस शिपाई सचिन कापडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी फिरोज धनानी याचा विरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई अभिजित अहिरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|