Header Ads Widget


मतदान जनजागृती कार्यक्रम महिला महाविद्यालयात संपन्न...

 

   


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील तालुका एज्युकेशन सोसायटी अँड को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना या एककाच्या वतीने "मतदार जनजागृती" कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.जे. पाटील होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ. कैलास चव्हाण ,धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे एन.एस.एस.चे विभागीय अधिकारी प्रा. काकासाहेब अनपट व प्रा. देवचंद पाडवी, प्रा. रेणुका पाटील उपस्थित होते.प्रा.डॉ. कैलास चव्हाण यांनी मतदान का करावे, मतदानाचा अधिकार व लोकशाही या संबंधी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रा. काकासाहेब अनपट यांनी मतदानाचा टक्का घसरतोय आणि या घसरत्या मतदानाचा टक्क्यामुळे योग्य व्यक्तीकडे सत्ता जाणे वंचित राहते म्हणून मतदान सर्वांनी करणे आवश्यक आहे. यामुळे लोकशाही जिवंत राहते या मुद्द्यांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.शेवटी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.जे. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगीतले की, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हेच सरकारमध्ये बसून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक असे कायदे तयार करीत असतात. कायदे आपल्या हिताचे असावे म्हणून आपण मतदान केले पाहिजे व योग्य व्यक्तीला सत्ता दिली पाहिजे. असे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश भुसारे यांनी केले तर सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण माळी यांनी मतदान करण्यासंदर्भात विद्यार्थिनी व उपस्थित कर्मचारी यांच्या कडून शपथ बोलून घेतली.



Post a Comment

0 Comments

|