Header Ads Widget


भागवत कथा ऐकल्याने वातावरण प्रफुल्लित होते म्हणून प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण करावे असे आवाहन भागवताचार्य अनिल शर्मा यांनी केले...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:परमेश्वराचे नामस्मरण करण्यासाठी साधना आवश्यक असते.मनातले भाव चांगले ठेवल्यास जनकल्याण होते.भागवत कथा ऐकल्याने वातावरण प्रफुल्लित होते म्हणून प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण करावे असे आवाहन भागवताचार्य अनिल शर्मा यांनी केले.शहादा येथील यशोदा नगर मधील नगरपालिका प्राथमिक शाळेच्या आवारात २ मे पासून भागवत कथा स्वतःचे आयोजन करण्यात आले आहे त्यात दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता भागवत कथेत भागवताचार्य अनिल शर्मा बोलत होते.दिनांक २ मे ते ८ मे पर्यंत भागवत कथा स्वतःचे आयोजन केले आहे.चितळकर परिवारातर्फे स्वर्गीय पांडुरंग चितळकर यांचे स्मरणार्थ भागवत कथेचे आयोजन केलेले आहे.५ मे रोजी अतिशय सुंदर असा कृष्ण जन्माच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.पुढे बोलतांना अनिल शर्मा यांनी सकाळपासून तर उशिरा रात्री झोपेपर्यंत परमेश्वराचे नामस्मरण करावे.सामाजिक कार्यातून देखील चांगली भक्ती होते चांगली सेवा करता येते.कीर्तनाच्या माध्यमातून चांगले संस्कार रुजवले जातात म्हणून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले पाहिजे असे सांगून कार्यक्रमात देशाला घडविण्यासाठी देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे देखील आवाहन करण्यात आले.भागवत कथा ऐकण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|