Header Ads Widget


श्री. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय कीर्तनाचे आयोजन

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:असलोद तालुका शहादा येथे तारखेप्रमाणे ९ मे रोजी असलेल्या श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक ७ मे पासून तर १० मे पर्यंत किर्तन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. ७ मे रोजी-कोमल सिंग महाराज आळंदीकर ८ मे रोजी-भानुदास महाराज आळंदीकर ९ मे रोजी-परमेश्वर महाराज आळंदीकर यांचे रोज रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या विषयावर महाराणा प्रतापसिंह जयंतीचा आधारावर कीर्तन होणार आहेत तर १० मे रोजी शुभम महाराज मंदाने कर सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तनाच्या कार्यक्रम होणार आहे.प्रथमच तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन असल्याने ग्रामस्थांना एक प्रकारे कीर्तनाची मेजवानीच ठरणार आहे.संयोजक म्हणून करणसिंग महाराज राजपूत असलोदकर कार्यक्रमाचे व्यवस्थापन क्षत्रिय राजपूत संघटना असलोद तर आयोजक असलोद ग्रामस्थ व भजनी मंडळ आहे.तरी कार्यक्रमाच्या लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आव्हान असलोद येथील क्षत्रिय राजपूत संघटनेने केले आहे.

Post a Comment

0 Comments

|