Header Ads Widget


श्री.स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ; सेवेकरी मंडळींनी सप्ताह चांगल्या पद्धतीने साजरा केला...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
शहादा येथील वृंदावन नगर ,मामाचे मोहिदा, दत्त मंदिर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दिनांक ३० एप्रिल सकाळपासून श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात करण्यात आली होती शेकडो सेवेकरी सेवा देण्यासाठी व दर्शनासाठी येत होते आज सोमवार रोजी सप्ताहाची सांगता पूर्णाहुती ने करण्यात आली . आठवडा भर चाललेल्या या कार्यक्रमाने परिसरात भक्तीमय वातावरण झाले होते . या सात दिवसात तीघ केंद्र मिळून जवळपास साडे तीनशे गुरु चरित्र वाचन करण्यात आले.या सप्ताहात महिला व पुरुष वर्ग आप आपल्या पद्धतीने सेवा देत असतात या मागील उद्देश म्हणजे या सेवेचा माध्यमातून स्वतः चे कुटुंब गाव शहर राज्य व देशाचा हिताचा व सरक्षांनाचा, सुजलाम सुफलाम होण्याचा व संस्कृती वर्धनाचा संकल्प केला जात असतो . दिनांक ३० एप्रिल ते ६ मे पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मंडळ स्थापना, स्थापत्य देवता हवन व पाठवाचन घेण्यात येवून .सामूहिक पाठ वाचन गुरुचरित्र पारायण वाचून आप आपला सहभाग नोंदवत. पहाटे पासून सेवेकरी सेवा रुजू करण्यासाठी येत असतात. गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी बसलेले सेवेकरी शहादा, मोहिदा, डोंगरगाव, गोगापूर, भागापूर या परिसरातील होते . १ मे रोजी गणेश याग मनोबोध याग नित्य स्वाहाकार तर २ मे रोजी श्री स्वामी याग साकारण्यात आला , ३ मे रोजी श्री चंडीयाग, ४ मे रोजी श्री गीताई याग , ५ मे रोजी श्री रुद्र याग श्री मल्हार याग व ६ मे रोजी पूर्ण आहुती व दत्त पूजन करून समारोप केला . सप्ताहात प्रहरे सेवा महिला सेवेकरी सकाळी ८ ती रात्री ८ व पुरुष सेवेकरी रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत अखंड करीत आहेत.समारोप वेळी सत्य नारायणाच्या प्रसाद व तेरा नैवद्याचा प्रसाद दिला जाऊन महाराजांची 147 वी पुण्यतिथी सप्ताहाचा माध्यमातून साजरी करण्यात आली . तिघे केंद्राचे पदाधिकारी व सेवेकरी मंडळींनी सप्ताह चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मेहनत घेतली

Post a Comment

0 Comments

|