Header Ads Widget


के. वाय. आर. पाटील माध्यमिक व आनंद कनिष्ठ कला महाविद्यालय शाळेतर्फे सेवापूर्ती सोहळा संपन्न..

 

    

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शिक्षण क्षेत्रात करून दाखवता येईल असे प्रचंड काम असते. भावी पिढी उज्वल घडावी यासाठी शिक्षकांची नेहमीच धडपड असते.शाळेतील सर्व सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून संस्थेचा व विद्यार्थी हिताच्या तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व तोपरी प्रयत्न करुन विविध उपक्रमांना प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन नवनियुक्त मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी केले. कहाटूळ (ता. शहादा)येथील के. वाय. आर. पाटील माध्यमिक व आनंद कनिष्ठ कला महाविद्यालयातून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले व्ही. बी. पाटील यांना शाळेतर्फे निरोप देण्यासाठीच्या समारंभ संपन्न झाला.त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून नवनियुक्त मुख्याध्यापक एस. एस. पाटील बोलत होते. यावेळी

 संस्थेचे संचालक प्रकाशभाई पाटील ,विकास इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. गवळे, पर्यवेक्षक हिरजी पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील यांना शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नूतन मुख्याध्यापक शरदभाई एस.पाटील यांच्याही स्वागत सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय चौधरी यांनी केले तर हंसराज पाटील, श्रीमती. विद्या पाटील, किशोर पाटील, कपिलेश्वर महाजन, श्री. गवळे, हिरजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून आपले अनुभव कथन केले.सत्काराला उत्तर देताना व्ही. बी. पाटील यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करून सर्व सहकाऱ्यांनी संयमाने काम करून शाळेचा नावलौकिक कायम राहावा यासाठी प्रयत्नशील राहणे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments

|