Header Ads Widget


सरदार पटेल ज्येष्ठ नागरिकांची व्दिमासिक सभा संपन्न...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळाची व्दिमासिक बैठक गांधीनगर येथील सभागृह संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य अशोक पाटील हे होते.बैठकीत मंडळाचे अध्यक्ष सतीश सोनवणे, सचिव आनंदराव विसपुते, ऊपाध्यक्ष एस बी पाटील, एड जी एस पाटील ऊपस्थित होते.सानेगुरूजी यांच्या प्रार्थनेने बैठकीला सुरुवात करण्यात आली. दिवंगत सभासद मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीचे काम काज सुरू झाले. मागील कार्यवृत्ताला मंजुरी देण्यात आली. एप्रिल व मे महिन्यात वाढदिवस असणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी जेष्टांनी आनंदमय जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले. डी जी पाटील यांनी एकत्र आले पाहिजे, सकारात्मक भूमिका जोपासली पाहिजे असे सांगितले.प्रा. नगीन पाटील यांनी हास्य दिना निमित्त हास्य कविता ऐकवली. यावेळी मगन भाई पाटील यांनी ज्ञानाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोक पाटील यांनी जेष्ठांना शुभेच्छा दिल्या व एकमेकांनी एकमेकांना सांभाळून वाटचाल केली पाहिजे असे सांगितले. बैठक संपन्न होण्यास विवेक भाई पाटील, पुंडलिक तांबोळी, सुरेश चौधरी,प्रा. मोहन चौधरी, शरद पाटील,के डी गिरासे व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. आनंदराव विसपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहार होऊन बैठकीची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments

|