Header Ads Widget


नंदुरबार तालुक्यातील जंगलात वणवा पेटला ; झाडे-झुडपे व चारा नष्ट!

नंदुरबार /प्रतिनिधी: नंदुरबार तालुक्यातील पश्चिम आष्टे बीट भागात असलेल्या टेंबरबारी कंपार्टमेंट 124 व 125 या जंगलात ता.07/04/2024 अंदाजे 00.08ते08.30 रात्रीपासून वनवा पेटत असल्याचे दृश्य दिसत होते. काही एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे.धगधगता वनवा पाहून अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. यासंदर्भात वन्यप्रेमींनी वनविभागाला संपर्क केल्यानंतर वनविभागाला जाग आली. घटनास्थळी कोणत्याही वन विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते,घटनास्थळी रात्री फक्त वनमजूर व अंबापूर,सुतारे,वाघाळे, श्रीरामपूर व अन्य परिसरातील ग्रामस्थ 70 ते 80 लोक उपस्थित होते,आग विझवण्यासाठी जंगलात रवाना झाले.डोंगराच्या आग काही एक-दोन तासातच नियंत्रणात आणली.
या आगीमुळे पश्चिम जंगलातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती,जैवविविधता धोक्यात आल्याची परिस्थिती आहे.या संदर्भात वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे, आग कशामुळे लागते याचा देखील शोध वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. वन विभाग मजूर व ग्रामस्थ सातत्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग विझवण्यासाठी दूर्गम भाग, तीव्र वारे आणि उच्च तापमानामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.आगीत कोणत्याही प्रकाराचे जिवितहानी नुकसान न झाल्याचा दावा वनविभागाच्या मजुरांनी केला आहे.आगीत फक्त कोरडा चारा व गवत जळाले आहे. जंगलात पुन्हा आग लागू नये यासाठी वनविभागाने नियोजन करणे गरजेचे आहे अन्यथा मौल्यवान वनस्पती,दुर्मिळ वनौषधी,जैवविविधता नष्ट होईल, वनविभागाच्या अधिकाऱ्याने देखील नंदुरबारच्या जंगलात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments

|