Header Ads Widget


१३ मे रोजी होणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदार संघातील मतदानासाठी पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात १३ मे रोजी होणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदार संघातील मतदानासाठी पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू असून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर आपल्या साहित्यासह रवाना करण्यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू असून कर्मचाऱ्यांना रवाना करण्यासाठी गाड्या देखील आवारात लावल्या जात आहेत. शहादा विभागाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी सुभाष दळवी व अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर नेमणूक केलेले कर्मचारी ईव्हीएम मशीन व इतर साहित्य रवाना करण्यासाठी आतापासून स्वतंत्र मंडप उभारण्यात येत आहे.मंडपात वेगवेगळे विभाग केले जातील.कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचाव व्हावा व इतर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आवारात गेल्या दोन दिवसापासून मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्रात एकूण १६३० कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात निवडणूक कामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.एकूण ३५० मतदान केंद्र आहेत.मतदान संपल्यानंतर १३ मे रोजी रात्रीच उभारण्यात येत असलेल्या मंडपातच कागदपत्र व ईव्हीएम मशीन जमा केले जाणार आहेत.तहसीलदार दीपक गिरासे स्वतः लक्ष घालित आहेत.

Post a Comment

0 Comments

|