Header Ads Widget


अतिरिक्त जास्त दाबाच्या विद्युत पुरवठा;20गावांचे ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचा इशारा...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा सुलतानपूर तालुका शहादा परिसरातील गावांमध्ये सध्या अतिरिक्त जास्त दाबाच्या विद्युत पुरवठा अनेक दिवसांपासून होत असल्याने अतिरिक्त जास्त विद्युत दाबामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणे जळण्याचे प्रमाण वाढले आहे.शहादा विद्युत वितरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर परिसरातील २० गावांचे ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.सुलतानपूर गावात सह परिसरातील गावांमध्ये अनेक दिवसांपासून वाजवीपेक्षा जास्त अतिरिक्त दाबाच्या विद्युत पुरवठा होत आहे परिणामी अतिरिक्त दाबामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहेत विद्युत उपकरणे इलेक्ट्रॉनिक उपकरणे पंखे लाईट फ्रिज टीव्ही सह इतर वस्तू जळण्याचे प्रमाण वाढले आहे.या बाबतीत परिसरातील नागरिकांनी म्हसावद येथील विद्युत उपकेंद्रातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली असता पूर्णतः दुर्लक्ष केले.याव्यतिरिक्त शहादा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सदरची घटना सांगितल्यानंतर अद्याप देखील उपाययोजना झालेली नाही.सुलतानपूर सह परिसरातील गावांमध्ये २३० ऐवजी ३१० होल्टेजच्या विद्युत पुरवठा दिला जात आहे जो अतिरिक्त आहे.इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तात्काळ जळतात.जळालेल्या वस्तू दुरुस्त होत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असते.शेतातील वीज देखील जाहीर केलेल्या वेळापत्रक प्रमाणे न देता अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे विद्युत पुरवठा देतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होते.काही वेळा शेतकऱ्यांना रात्री विद्युत मोटारी सुरू करण्यासाठी जावे लागते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तात्काळ दखल न घेतल्यास परिसरातील कमीत कमी २० गावांचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Post a Comment

0 Comments

|