Header Ads Widget


महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी दिनांक ९ मे रोजी तारखेप्रमाणे असलेल्या महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून शहरातील अनेक मान्यवरांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रक्तदान शिबिराला भेट दिली.प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजीत पाटील शहादा नंदुरबार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे सरकारी वकील ॲड.सुवर्णसिंग गिरासेशहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र रावल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक मकरंद पाटील रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव उद्योजक नुहभाई नुरानी भोई समाजाचे ज्येष्ठ नेते सुपडू खेडकर माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी माजी नगरसेवक रवींद्र जमादार नागरी हित संघर्ष समितीचे यशवंत चौधरी जायट्स ग्रुप अध्यक्ष डॉक्टर विवेक पाटील बालरोग तज्ञ डॉक्टर प्रदीप कुमार पटेल शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड सह राजकीय सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी संकल्प ग्रुपचे सदस्य इन्कलाब फाउंडेशन ग्रुपचे सदस्य जायट्स ग्रुपचे सदस्य शहरातील असंख्य माजी नगरसेवक संस्थांचे पदाधिकारी समाजातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव उपस्थित होते.सकाळपासून तर उशिरा सायंकाळपर्यंत महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शहरातील नागरिक समाज बांधव स्मारकाच्या ठिकाणी येतच होते.रक्तदानासाठी सकाळी रक्तदात्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.रक्तदात्यांसाठी शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या.उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.शहादा नगरपालिका प्रशासनाने देखील सहकार्य केले.महिलांच्या सहभाग-रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे चार ते पाच महिलांनी देखील रक्तदान केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.रक्तदान शिबिरासाठी नवजीवन ब्लड बँक धुळे व संकल्प ग्रुपचे सहकार्य लाभले.नवजीवन ब्लड बँक धुळे तर्फे रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आली. महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन व रक्तदान शिबिरासाठी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शहादा तालुका राजपूत समाज मंडळाच्या पदाधिकारी व संचालकांनी योगदान दिले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहादा तालुक्यात समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत यांनी केले.नवजीवन ब्लड बँक धुळे येथील सुनील चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments

|