Header Ads Widget


अक्षय तृतीया निमित्त बाजारपेठेत आंबे डांगर व मातीचे मडके सह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरात दिनांक १० मे रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया निमित्त बाजारपेठेत आंबे डांगर व मातीचे मडके सह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.अक्षरशः शहरातील मुख्य रस्त्यांवर लावलेल्या हात गाड्यांमध्ये आंबे विक्री करणारे दिसत होते.सर्वाधिक खरेदी आंब्यांची केली जात होती. हिंदू संस्कृतीमध्ये अक्षय तृतीया या सणाला खूप महत्त्व आहे.या दिवशी पूर्वजांना श्राद्ध टाकला जातो.शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीला मुक्ती मिळावी म्हणून कुटुंबातील सदस्य रांजण भरण्याच्या कार्यक्रम करतात त्यामुळे शहादा शहर चा परिसरात वर्दळ वाढलेली होती.रांजण खरेदी करण्यासाठी अर्थात मातीचे मडके खरेदी करण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केलेली होती.मातीच्या मडक्यावर अथवा तांब्याच्या कलशवर ठेवण्यासाठी डांगर देखील सोबत खरेदी केली जात होते. नवीन दुकानाच्या व्यवसायाच्या शुभारंभ ठीक ठिकाणी केला जात होता.घरांच्या बांधकामाची भूमिपूजन नवीन वस्तू खरेदी केली जात होती.नवीन वाहन खरेदी केली जात होती.शेतकरी शेतात पूजा करत होते.शहादा नगरपालिका कार्यालय जनता चौक चार रस्ता महात्मा गांधी पुतळा मेन रोड बस स्थानक परिसर शासकीय विश्राम गृह परिसर भाजी मार्केट परिसरात छोट्या व्यवसायिकांनी आंबे विक्रीची डांगर तसेच मडके विक्री करणाऱ्यांनी दुकानी थाटले होते.मेन रोड व चार रस्ता भागात मोटरसायकल काढणे देखील कठीण जात होते एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.शहरातील सप्तशृंगी माता मंदिर तुळजाभवानी प्रेस मारुती कोटेश्वर महादेव मंदिर अंबाजी मंदिर म्हाळसादेवी मंदिरात भाविकांनी दर्शन घेण्यासाठी व प्रसाद चढवण्यासाठी गर्दी केलेली होती.एकंदरीत अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती शिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली.

Post a Comment

0 Comments

|