Header Ads Widget


मुस्लिम बांधव हज यात्रेस जात असल्याने त्यांना देण्यात येणारी मेंदुज्वर लस टीका स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून द्यावी:मुत्तहित मुस्लिम जमाअत संस्थेच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन...

 

   


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहर - परिसरातून प्रतिवर्षी दिडशे पेक्षा जास्त मुस्लिम बांधव हज यात्रेस जात असल्याने त्यांना देण्यात येणारी मेंदुज्वर लस टीका घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जावे लागते.रुग्णालय गावा बाहेर असल्याने वयोवृद्ध हज यात्रेकरुना एकाच दिवशी शक्य नसल्याने तसेच उन्हाळ्याचे तापमाण,वेळ व पैशांचे अपव्यय होत असल्याने टीकांकरण शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी सार्वजनिक रुग्णालयात करण्यात यावी असे अश्याच निवेदन शहादा मुत्तहित मुस्लिम जमाअत संस्थाचे वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले आहे. शहादासह नंदुरबार जिल्ह्य़ातून मुस्लिम समाजातील महीला पुरूष प्रतिवर्षी तीनशेहून जास्त हज यात्रेला जात असतात. तिर्थस्थानी जाण्यासाठी वर्षे भरापासून पासपोर्ट पासून इतर अवश्यक घटक पुर्ण करण्यासाठी तयारीसाठी सुरवात होते केव्हा तरी मुंबई येथील हज कमेटी संबधीताना हज जाण्याची निश्चितच करत असते. हज यात्रेला जाण्या अगोदर यात्रेकरुना प्रशिक्षित करण्यासाठी व हज यात्रा कशी करावी कोणत्या बाबी जरुरीचे आहे यांचे प्रशिक्षण धुळे येथील हाजी अखलाख मौल्वी, नसीम खुर्शीद मौल्वी, अब्दुल मन्नान मौल्वी, शम्मीभाई,लालाभैय्यया, सैय्यद भी, अब्दुल मुहित व सहकाऱ्यांनी शहादा - नंदुरबार - धुळे येथे प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. प्रशिक्षण दरम्यान रजियोद्दीन मुन्शी, डॉ. फरिद बागवान, नासिर पठाण, रफिक मॅकेनिकल, मुन्ना टेलर, शकिल अन्सारी, शुजाअत अली कादरी, आरिफ हाफीज यांचे सहकार्य लाभले आहे.  हज यात्रेला जाण्या अगोदर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून मेंदुज्वर लस टीकांकरण करणे अनिवार्य असते, ही लस घेण्यासाठी शहादा येथील शंभर दिडशे हज यात्रेकरुना एकाचवेळी नंदुरबार जिल्हा रुग्णालय गाठावे लागते. या दिडशे लोकांना मध्दे काही वयोवृद्ध व्यक्तींच्या समावेश असतो.हजला जाणारे बांधवाना लस घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालय पोहोचवेल लागते या दिडशे सोबत हज जाणारे कुटुंबातील एक-दोन व्यक्ती सोबत राहातात त्यामुळे सख्या तीप्पटीने वाढते. ऐन ऊन्हाळ्यात शहाद्याहून निघुन नंदुरबार व तेथून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात जावे लागते या दरम्यान हज यात्रेकरु व सोबतचे नातेवाईक यांचे मानसिकता हतबल होते सोबत वेळेचा अपव्यय, आर्थिक झळ सोसावी लागते. ऊन्हाळ्याचा तडाखाने ऐकाच वेळी पोहचणे शक्य नसल्याने पुर्वी प्रमाणे गत चार वर्षे आगोदर शहरात कॅम्प लावून मेंदुज्वर टीकांकरण करण्यात येत होते.  हज यात्रेकरुंचे हित लक्षात घेऊन त्यांना व सोबत येणारे लोकांची मानसिक त्रास, आर्थिक त्रासात पासुन मुक्त करण्यासाठी हज यात्रेकरुना शहादा शहरातील गरीब नवाज वसाहतीत सार्वजनिक रुग्णालयात मेंदुज्वर लस देण्यात यावी. लस देण्यासाठी आलेल्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपुर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे शहादा येथील मुत्तहिद मुस्लिम जमाअत संस्थाचे वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री व नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयचे अधिकारी याना संस्थेचे वतीने निवेदन देण्यात आले यावेळी संस्थाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ. अजहर पठाण, कार्यध्यक्ष बासीतअली कादरी, रजियोद्दीन मुन्शी, मोईनोद्दीन शेख, रफिक नुरा, जुबेर खान इरफान पठाण व मुन्ना टेलर, रफीक मॅकनीक, प्रा. अबरार खान, राजु शेख होते. 



Post a Comment

0 Comments

|