Header Ads Widget


इशातुल उलूम, संस्था अक्कलकुवा,बोगस लेटरपेडवर खोटी सही स्कॅन करून निवडणूक संबंधी चुकीचे पत्र प्रसारित - गुलाम मोहम्मद वस्तानवी संस्थापक जामिया इस्लामिया याचा खुलासा

अक्कलकुवा दि ११ (प्रतिनिधी) गुलाम मोहम्मद वस्तानवी संस्थापक जामिया इस्लामिया इशातुल उलूम अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार. मी कोणत्याही अशा लेटरपेड वर सही केलेली नाही, की ज्या मुळे कोणत्याही राजनैतिक पार्टीला मी पाठिंबा दिल्याचे दिसून येते.

जामिया इस्लामिया ईशातूल उलूम, अक्कलकुवा संस्थेचा बोगस लेटरपेड बनवून त्यावर खोटी सही स्कॅन करून निवडणूक संबंधी चुकीचे पत्र प्रसारित केले आहे. सदर पत्राशी माझा काहीही संबंध नाही. सदर पत्र संस्थेबद्दल व समाजाबद्दल गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे. पत्रातील मजकूर ही जाणूनबुजून दोन समाजामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्न केल्याचे दिसून येते. निवडणुकीला समोर ठेवून दिशाभूल करणाऱ्या पत्राची मी निंदा करीत आहे.असे पत्रक संस्थापक अध्यक्ष 

मौलाना गुलाम मुहम्मद वस्तानवी.जामिया इशातुल उलूम, अक्कलकुवा यांनी प्रेस नोटवर सही केली आहे.

Post a Comment

0 Comments

|