Header Ads Widget


रस्ता दुभाजकाच्या लोखंडी जाळी अज्ञात चोरट्यांकडून खुले आम चोरीस जात असल्याची चर्चा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष...



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
शहादा शहरातील मुख्य प्रवेशद्वार पासुन तर नगर पालिकेच्या लगत असलेल्या महात्मा गांधी पुतळा वळसा पर्यंत रस्ताचा दोघे भागात सौंदर्यात भर टाकणारे दुभाजाकां मध्दे लावलेल्या वृक्षांचा संरक्षणासाठी लोखंडी जाळ्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून ठिकठिकाणीचा भागातील लोखंडी जाळी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असून नगरपालिकांचे हजारो रुपये किमतीची लोखंडी जाळी अज्ञात चोरट्यांनी कडुन खुले आम चोरीस जात असुन संबंधित प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होवू लागली आहे.शहादा नगर पालिकेच्या मागच्या टर्मला लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर अशोक बागुल विजयी झाले होते. शहराचे विकासाचे व्हिजन असलेले नेते होते. शहरातील बेकायदेशीर वाढते अतिक्रमण यास आळा घालण्याकरता तसेच पुढील पंचवीस वर्षे वाढणारी लोकसंख्या वाहण यावर आत्मचिंतन करीत तत्कालीन नगराध्यक्ष अशोक बागुल यांनी शहराचा मुख्य प्रवेश द्वारा पासुन ते थेट महात्मा गांधी पुतळा पर्यंत रस्ताचा मधोमद दुभाजक टाकण्यात आले एवढेच नव्हे तर त्या दुभाजकाचा मध्ये अनेक वृक्ष लावत संगोपन केले.लावलेले वृक्षाची नासधुस, बकरी गुरेढोरे खाऊ नये त्यांना वर चढता येऊ नये म्हणून लोखंडी जाळण्चे संरक्षण लावण्यात आले. पालिका व विकास फंडातून लाखो रूपये निधी खर्च करत हा दुभाजक शहरातील सैंदर्यात भर पाडत आहे . शहराच्या मुख्य प्रवेश द्वारा पासून ते आंबेडकर पुतळ्या, गांधी पुतळा पर्यंत दुभाकाच्या लोखंडी जाळ्या बसविण्यात येवून मधोमध सुशोभीकरणाचे झाड लावण्यात आले होते त्यांना नित्य नियमाने पाणी देण्याचे काम देखील नगरपालिका प्रशासनाकडून होत होते. रस्ता दुभाजक झाल्यामुळे पादचारी तसेच वाहन चालवणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येत नव्हत्या, शहरातील व बाहेर गावाहून आलेल्त्याया लहान मोठी वाहन चालक रस्ताचा एका बाजुला लावत असल्याने रहदारीस अडथळा दुर झाल्याने अपघाताचे प्रमाण देखील कमी होऊ लागले होते. शिवाय सुशोभीकरण असलेली झाड झुडप लावल्याने शहराच्या सौंदर्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली, याच सोबत झाडे मोठी झाल्याने वाढलेल्या फांदीने सावली पडु लागली हवा येऊ लागल्यानण लगतचे दुकानदारांना ऊन्साहाळ्यातील गरमावा कमी झाला होता. माणसा सोबत जनावर देखील झाडांचा फांद्यांची सावलीचा आसरा घेत काही वेळ थांबत आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून यादुभाजक मधील झाडाकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक झाडांचे नियोजन न झाल्यामुळे झाडे मरगळुन गेली. दुभाजक मध्ये लावलेल्या झाडाचे देखरेख संगोपनची जबाबदारी पालिका प्रशासनाकडून सोपवली गेली नसल्याने अनेक झाडे जगली नाही जे काही जगली तिची निगराणी ठेवली गेली नाही. पालिका प्रशासना कडुन शहरातील प्रत्येक घराचा कडून प्रतिवर्षी एक रुपया पासुन पाच रुपये वृक्ष कर घेते मग हा निधी जातो कुठे ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. अनेक झाडाची रात्रीतून कत्तल झाली आहे एवढेच नव्हे तर नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे दुभाजक असलेल्या बऱ्याचश्या लोखंडी जाळ्या रात्रीतून चोरट्यांनी काढून नेल्या तर काही ठिकाणी जाळ्या गळून पडल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या कर निधीमधून बनविलेले दुभाजाकावरील जाळ्या चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासनाविषयी नाराजीच्या सुर उमटत आहे. नगरपालिका प्रशासनाने जर लक्ष दिले आणि पुन्हा दुभाजक व त्यावरील जाळ्या सुस्थितीत करून गरज असेल त्या ठिकाणी झाड झुडपे नव्याने लावले तर शहराच्या सुशोभीकरणांमध्ये पुनश्च एकदा भर पडेल अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.. 


Post a Comment

0 Comments

|