Header Ads Widget


मोठ-मोठाले जीव घेणे खड्डे पडले आहेत मात्र नगरपालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने वाहनधारक व नागरिक संतप्त...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या शिवाय मुख्य रस्त्यांवर अनेक दिवसापासून मोठ-मोठाले जीव घेणे खड्डे पडले आहेत मात्र नगरपालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने वाहनधारक व नागरिक संतप्त झाले आहेत.या जीवघेणा खड्ड्यांमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहादा नगरपालिका मार्फत गेल्या दीड वर्षात प्रत्येक प्रभागात गल्लीबाेळात रस्त्यांची कामे करण्यात आली.काही रस्त्यांचे डांबरीकरण तर काही रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले आहे.मात्र ज्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले ते रस्ते एकमेकांना ज्या ठिकाणी जोडले गेले आहेत त्या ठिकाणी खोलगट मोठ्या चाऱ्या पडल्या आहेत.काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.रोज दिवसभरातून शेकडो वाणीच्या खड्ड्यांमध्ये त्या चाऱ्यांमध्ये आदळत आहेत.अनेक मोटर सायकल स्वार अपघात ग्रस्त झाली आहे.रात्री-ते रात्री मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण रात्रीच्या वेळी लांबून खोलगट चारी व मोठे खड्डे दिसत नाहीत.अनेक वेळा वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित झाली आहे पण नगरपालिका प्रशासनाने भग्याची भूमिका घेतली आहे.शहरातील जुना मोहिदा रस्त्यावर स्वामी समर्थ केंद्र जवळ चार रस्ते एकमेकांना जोडले गेले आहेत ज्या ठिकाणी रस्ते जोडले गेले तिथे भला मोठा गोलाकार खड्डा तयार झालेला आहे.या भागात या खड्ड्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.तीच अवस्था खेतीया रस्त्यावर डांबरीकरण केलेला रस्ता व कॉंक्रिटीकरण केलेला रस्ता या दोघांच्या मध्ये खोलगट चारी पडली आहे.शहरातील मुख्य रस्ता असल्याने हजारो वाहने ये जा करतात. त्या चारीत वाहने आदळतात. तीच अवस्था नगरपालिका जवळ चार रस्त्यावर आहे.वनविभाग कार्यालय जवळ आहे.नगरपालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे खोलगट चाऱ्या खडी मुरूम न टाकता डांबर रेती व खडीने पावसाळ्यापूर्वी बुजवावेत अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.मुख्य रस्त्यांवरील पडलेले मोठे खड्डे नगरपालिका प्रशासनाने त्वरित बुजवावेत. नागरिकांची सहनशीलता संपली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करावी.अन्यथा नाईलाजाने नागरिक आंदोलन करतील, यांवर लक्ष केंद्रित करणे...

Post a Comment

0 Comments

|