Header Ads Widget


नंदुरबार लोकसभा निवडणूक शहादा शहरांसह ग्रामीण भागात मतदान अत्यंत शांततापूर्ण वातावरणात झाले...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहादा शहर सह तालुक्याची सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६३.४६ टक्के मतदान झाले होते.शहादा शहर सह ग्रामीण भागात मतदान अत्यंत शांततापूर्ण वातावरणात झाले.गेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणूक पेक्षा यावेळी तालुक्यात मतदारांमध्ये कमालीच्या उत्साह होता. मतदानापूर्वी प्रचारा दरम्यान कमालीची चुरस होती. शहादा तालुक्यात भाजपाच्या डॉक्टर हिना गावित व काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी यांच्यातच खरी अटीतटीची लढत झाली आहे.सकाळपासूनच शहादा शहर सह ग्रामीण भागात प्रत्येक मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. दुपारी कडक उन्हामुळे मतदानावर परिणाम झालेला दिसून आला. मतदान करणाऱ्यांची संख्या कमी झालेली होती नंतर ती पुन्हा दुपारी चार वाजेनंतर वाढली. पाच वाजे नंतर पुन्हा मतदारांची गर्दी झालेली दिसून आली. शहादा शहरात १५ आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलेली होती.

सर्वाधिक मतदारांची गर्दी वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, शारदा कन्या माध्यमिक विद्यालय , म्युन्युसिपल स्कूलच्या मतदान केंद्रांवर मतदारांची कमालीची गर्दी होती. वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रांवर उशिरा सायंकाळपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. लाडकोर बाई माध्यमिक विद्यालय, सिद्धार्थ नगर समाज मंदिर , व्हॅालंटरी माध्यमिक विद्यालय, शेठ व्हि.के.शहा विद्यालय, संत गाडगे महाराज, नगरपालिका प्राथमिक शाळा मतदान केंद्रांवर देखील चांगलीच गर्दी होती.दिव्यांग अपंग व वयोवृद्ध व्यक्तींचे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन मतदान घेतल्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग व अपंग मतदार दिसून आले नाहीत. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना आपले नाव व क्रमांक माहितीसाठी विविध संघटनांनी व कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मंडप लावून व्यवस्था केलेली होती. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.शहादा शहरात शारदा कन्या माध्यमिक विद्यालय, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय व म्युन्यूसिपल स्कूलमध्ये प्रत्येकी एक महिलांसाठी स्वतंत्र सखी मतदान केंद्र तयार करण्यात आलेली होती. ज्याला रंगीबेरंगी फुग्यांनी तसेच झाडांची रोपे ठेवून सजवण्यात आलेली होती. महिलांच्या सखी मतदान केंद्रात सर्व महिला कर्मचारी होत्या.  प्रत्येक मतदान केंद्रात आशा वर्कर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती. त्यांच्यासोबत प्राथमिक उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. मुस्लिम बहु वस्ती असलेल्या मतदान केंद्रात मतदारांची ओळख करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती. शहादा-तळोदा विधान सभा क्षेत्रात ३५९ मतदान केंद्र करण्यात आलेले होते व १६३० कर्मचारी नियुक्त केलेले होते. एकंदरीत या लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये चांगला उत्साह होता शिवाय मतदानाची टक्केवारी देखील वाढलेली दिसून आली.ग्रामीण भागात सर्वाधिक चुरस प्रकाशा, सारंगखेडा , तोरखेडा, मंदाने , असलोद लोणखेडा, पाडळदा या गावांमध्ये दिसून आली. कार्यकर्ते मतदारांना घरोघरी जाऊन मतदान करण्यासाठी आव्हान करीत होते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू होती. भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांनी शहादा शहर सह परिसरातील मतदान केंद्रांवर भेटी देऊन कार्यकर्त्यांची चर्चा केली.या व्यतिरिक्त भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दीपक पाटील, मकरंद पाटील, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजीत पाटील, नंदुरबार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, जिल्हा शिवसेना प्रमुख अरुण चौधरी, रामचंद्र दशरथ पाटील , रवींद्र रावल सक्रिय दिसून आले.मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुभाष दळवी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक गिरासे,तळोदयाचे दीपक धिवरे, निवडणूक नायब तहसीलदार शैलेंद्र गवते आदींसह कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलीस विभागातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.



Post a Comment

0 Comments

|