Header Ads Widget


श्री.महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त रक्तदान शिबिर व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील श्री महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त तारखेप्रमाणे येणाऱ्या ९ मे रोजी शहादा शहरातील महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे सकाळी साडेआठ वाजता रक्तदान शिबिराचे व अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार तसेच पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.अभिवादनानंतर स्मारकाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येईल.रक्तदान शिबिरासाठी मंडप लावण्यात येणार आहे.आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.रक्तदान शिबिरासाठी विविध सेवाभावी संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी रक्तदान शिबिराच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन योगदान देण्याचे आवाहन शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे करण्यात आले आहे .शिबिरासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँक व शहादा येथील संकल्प ग्रुप यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिरासाठी योगदान लाभणार आहे.रक्तदात्यांना नवजीवन ब्लड बँक धुळे यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments

|