Header Ads Widget


सर्व शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
शहादा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप केली जातात.शहादा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना पुस्तके वाटप साठी गटशिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कार्यरत झाली असून एकूण ६२४१४ पुस्तके यावर्षी वाटप केली जाणार आहेत.नंदुरबार येथून शहादा येथील गट साधन केंद्रात पुस्तके यायला लागली आहेत.

         काही पुस्तके शहादा पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात व काही पुस्तके नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ९ व १६ मध्ये ठेवली जात आहेत.रोज साधारणता ४ ते ५ गाड्या पुस्तकांच्या भरलेल्या रिकाम्या केल्या जात आहेत.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली जातात.विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लागलीच शिक्षण विभागाकडून विद्यार्थी संख्या मागवली जात असते.तालुक्यातील सर्व शाळांची विद्यार्थ्यांची संख्या नंदुरबार जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात पाठवली जात असते त्या आधारावर प्रत्येक तालुक्याला पुस्तके दिली जात असतात.

       शहादा तालुक्यात यावर्षी मराठी माध्यम ५१४५० उर्दू माध्यम ३७४८ व सेमी इंग्रजी माध्यम ७२१६ एवढी पुस्तके वाटप केली जाणार आहेत.पुस्तके वाटप करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावळे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे व शिक्षण विस्तार अधिकारी मोरे योगदान देत आहेत.

         शहादा तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयांमध्ये त्यांच्या मागणीप्रमाणे पुस्तके वाटप केली जातील.कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.सर्वांना सहकार्य केले जाईल.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न राहील-डॉक्टर योगेश सावळे-गटशिक्षण अधिकारी शहादा.

Post a Comment

0 Comments

|