Header Ads Widget


गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती लोणखेडा येथे साजरी..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:तथागत गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती लोणखेडा येथे साजरी करून सामूहिक बुद्ध वंदना व त्रिशरण, पंचशील घेण्यात आले.

         यावेळी संजय मोहिते आणि रत्नाबाई मोहिते या दाम्पत्यांनी तथागत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान वंदना दिली. कार्यक्रम प्रसंगी बोलतांना रत्नाबाई मोहिते यांनी रमाबाईंनी गरिबीत जसे बाबा साहेबांना साथ दिली तसे आपणही सर्व महीला मिळून समजाल साथ द्यावी असे आवाहन केले.

          गौतम महीरे यांनी तथागत गौतम बुद्धांचा वैशाखी पोर्णिमेला जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी घडल्या आहेत या बद्दल माहिती दिली. आयु.जगदीश आगळे यांनी यावेळी मुलांनी स्पर्धेत टिकावे कोणीही मागे राहू नये त्यासाठी विविध शैक्षणिक योजनाची माहिती देत मार्गदर्शन केले.    

           कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी घोडराज यांनी भीमा विचार तुझा पिंपळाच पार आहे. या गाण्याने केली. कार्यक्रमाची प्रस्तावना माजी कमांडो दिलीप पवार तर आभार योगेश ढोढरे यांनी मानले

                   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भैय्या साळवे, सुनील रंगदास, सतीश पानपाटील, दीपक मोहिते, विनोद घोडसे, दिलीप रामराजे, दिलीप बागले, अशोक ठाकरे, पुंडलिक पानपाटील, संजय बच्छाव, चंद्रकांत रामराजे, यशवंत नाईक, उत्तम महिरे, आप्पा रंगदास, सुरेश रंगदास, महादू माणिक, नामदेव ठाकरे, मका मोहिते, विलास पवार, सोमा महिरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|