Header Ads Widget


शेतकऱ्यांना घरगुती पध्दतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहिम अंतर्गत बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजित...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील मौजे शहाणा येथे शहादा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत खरीप हंगाम पूर्व गाव बैठकीत शेतकऱ्यांना घरगुती पध्दतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहिम अंतर्गत बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी सांगितले की, खरीप हंगामाची तयारी सुरू असून घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिकाद्वारे बियाणे घरचे असो अथवा बाजारातील त्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी करुनच पेरणी करावी. बियाणाची उगवण चागली झाली नाही तर आपले उत्पन्नात घट होऊन पुर्ण हंगाम वाया जातो. आपल्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून बियाणांची उगवण क्षमता तपासणी करुन जर बियाणे 70% च्या वर ऊगवण क्षमता असेल तरच पेरणीसाठी उपयुक्त असते. बाजारातुन बियाणे आणुन पेरणी झाल्यानंतर बियाणाची पिशवी, टँग, मुठभर बियाणे हंगाम संपेपर्यत साभाळून ठेवावे. पी.एम.किसान सन्मान निधी, ई-के वाय सी, आधार सेंडीग, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, उताराला आडवी पेरणी करणे तसेच कृषि पर्यवेक्षक एकनाथ सावळे यांनी पण हुमणी किड व्यावस्थान, प्रमुख खरीप पिक क्राॅपसाँप, डाँ.पंजाबराव देशमुख अंतर्गत सेद्रिय शेती, ठिंबक सिंचन योजना, माग्रारोहयो फळबाग लागवड, महाडीबीटी योजना, सोयाबिन तुर पिक प्रत्याक्षिके अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका आपत्कालीन पीक नियोजन, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी मूलस्थानी साधारण बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

         यावेळी उपसरपंच नरेद्र भंडारी, ग्राम पंचायत सदस्य राकेश सुळे, प्रगतीशील शेतकरी मधुकर भंडारी, आप्पा सुळे, रायमल पावरा, राजाराम सुळे, मका तडवी, खंडू पटले आदी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|