Header Ads Widget


उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय परिवारातर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात वसंतराव नाईक व शारदा कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय परिवारातर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव होते.

           यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट-गाईड आयुक्त वर्षा जाधव संस्थेचे समन्वयक संजय राजपूत संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा. हिमांशू जाधव वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र मोरे उपप्राचार्य जे.बी. पवार पर्यवेक्षक ए.ए.खान शारदा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.झेड.सैय्यद उपस्थित होते.

       प्रथम वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेत प्रथम आलेली अर्पिता महेंद्र काटे द्वितीय आकांक्षा महेंद्र पाटील तृतीय प्रभू संजय जाधव व रिंकू राजूसिंग राठोड तर कला शाखेत प्रथम आलेलीपायल हिरालाल चव्हाण द्वितीय पल्लवी दिलीप पंडागळे तृतीय जयेश विजय जाधव तसेच शारदा कन्या विद्यालयातील कला शाखेत प्रथम आलेलीदिपाली युवराज कोळी द्वितीय आलेली रोजमीन बानाे तृतीय आरती कांतीलाल कोळी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन शिवाय पालकांच्या देखील सन्मान करण्यात आला.

        यावेळी बोलतांना प्राध्यापक संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात जिद्द व चिकाटी बाळगावी म्हणजे यश प्राप्त होते.आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने मेहनत करा.चांगले संस्कार आत्मसात करून संस्थेचे व शाळेचे नाव उज्वल करा असे सांगून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किरण भावसार व एस.एस.मोरे यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|