नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:अतिदुर्गम सातपुडा पर्वत रांगेतील दऱ्याखोऱ्यातील भागात ऐन ऊन्हाळ्याचा दिवसात डोंगराची काली मैना शहरातील बाजारपेठेत "बंबईची काली मैना" म्हणुन विक्रीस उपलब्ध झालेली आहे. खट्टी मिठ्ठी लागणारी करवंद साठ रुपये पावशेर दर दोनशे रूपये किलोने महिला मोठ्याप्रमाणात खरेदी करत आहेत, चार-पाच ठिकाणी ठेलागाडीवर करवंद दरोरज पन्नास किलो पेक्षा जास्त विक्री होत आहे.
नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुबल आहे. सातपुडा पर्वत रांगेतील मोलगी, धडगाव व तोरणमाळ, साक्री, भागातील दऱ्या खोऱ्यात काली मैना (करवंद) उत्पन्न होत असते. ऐन उन्हाळ्यातील होणारे माल तोडून आदिवासी लोकांचे कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. सातपुडा पर्वताच्या भागात एकेकाळी गोरगरीबांना रान मेवा उत्पादनात अग्रेसर होता. परंतु यापरिसरातील झाडेझुडपे तोडून डोंगर भकास झाल्याने पहाडातील सामान्य माणसाच्या रानमेवा सिताफळ, करवंद, चिंच, आवळा, जामुन लोकांना मिळणे दुरापास्त होत चालला आहे. अनेक झाडांची वनस्पती रोगावर औषद म्हणून वापरत होते.
सातपुडा पर्वत भागातील करवंद हे बंबईची काली मैना म्हणुन शहरात विक्री केली जात आहे. करवंद खवय्यांची संख्या जास्त आहे. आंबट-गोड लागत असल्याने लहान मुलांना उन अबालवृध महिला पुरुष ही वस्तु चवीने खातात. करवंद खाताना त्यावर थोडे मीठ टाकल्याने चवदार लागते करवंद फळ सामान्यांना काजु-बदाम आल्याचा आनंद मिळतो. करवंदाचे उत्पन्न काढणारे शेतकरी कडून ठोक व्यापारी शंभर ते सव्वाशे रुपये किलो दराने खरेदी करत रिटेल मध्ये साठ रुपये पावशेर दर दोनशे रूपये किलोने विक्री होत आहे. प्रतिवर्षी एप्रिल - मे महिन्यात काली मैना उत्पन्न मिळते असते. या खरेदी करीता खवय्यांची गर्दी होत असते.
सकाळी सकाळी उठून पहाडातून करवंद तोडून बाजार पेठे पर्यंत पोहोचाव लागते सध्या दैनंदिन पंधरा वीस किलो माल निघतो या अगोदर पन्नास किलो पेक्षा जास्त माल निघत असल्याचे मिराबाई पावरा हिने म्हटले आहे.
0 Comments