Header Ads Widget


संगमनेर तालुक्यातील पठार भागातील तरूणांची पावले गुन्हेगारीकडे..

 


संगमनेर प्रतिनिधी /विशाल कुरकुटे:
तरुणांना हाताला काम नाही, अशी अवस्था निर्माण झाली असून गुन्हेगारी व सावकारीकडे वळताना दिसत आहेत. त्यांच्या मुसक्या आत्ताच आवळणे गरजेचे आहे. समाजातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता, यामध्ये युवकांची संख्या जास्त असल्याचे दिसते. घरफोड्या, सोनसाखळी चोरणे, सोन्याच्या दागिन्यांना फसवणूक करणे, दुचाकी, चारचाकी वाहनांची चोरी, तोडफोड, पाण्याची मोटर केबल घरफोडी जाळपोळ करणे, आर्थिक फसवणूक, खंडणी मागणे, सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरपणा करून शांतता भंग करणे, मुलींची छेडछाड, बलात्कार, हल्ले या सर्व गुन्ह्यांमध्ये तरुण पिढी पुढे असल्याचे दिसते. कुठल्याही किरकोळ कारणावरून वाद-विवाद, भांडण उकरून काढून एकमेकांवर प्राणघातक हल्ले करणे, जो भांडण सोडवायचा प्रयत्न करेल त्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गटबाजी करणे, टोळ्या बनवणे, गुन्हेगारी कारवाया करण्याचे आपले परिसर ठरवून घेणे आणि जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना दमबाजी करणे, त्यांचे मोबाईल, पाकीट, घड्याळ हिसकावून पलायन करणे अशा घटनांमध्येही युवकांची संख्या लक्षणीय आहे.छोट्या-छोट्या गावा मध्ये स्वतःचे विविध चित्रविचित्र कुटुंबात लहानपणापासून पाहात अवतारालले फोटो बैनर, होर्डिंग आणि पोस्टरवर लावण्यातपण युवा पिढी सक्रिय आहे. ज्या वयात शैक्षणिक, वैचारिक, व्यावसायिक, सामाजिक कर्तृत्व दाखवून आपली तसेच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणं अपेक्षित असतो. त्या वयात अतिशय तरणीताठी मुलं आपले आयुष्य स्वतःच्या हाताने बरबाद करून घेताना दिसतात. मुळात आई वडिलांची हालाखीची परिस्थिती, घरातून लहानपणापासून मिळू न शकलेले चांगले संस्कार अथवाआलेले व्यसनाधीन व्यक्ती, नातेसंबंधातील ताणतणाव, नात्यांम थील हिंसाचार यामुळे या मुलांची नजर मेलेली असते. ही मुले ज्या परिसरात अथवा ज्या घरात जन्माला येतात तिथे आयुष्याबाबत कोणीही सकारात्मक, चांगले, योग्य मार्गदर्श'नकरणारे त्यांना भेटलेले आर्थिक परिस्थिती सातत्याने नसते. दुर्बल असल्यामुळे लहानपणापासून अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी होत असलेल्या हालअपेष्टा सोसून त्यांबा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय वेदनादायी झालेला असतो. त्यामुळे आता मिळेल तसा, मिळेल तिथून पैसा मिळवणे, आपल्या गरजा भागवणे हेच ध्येय अशा तरुणांसमोर असते. दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी, उव्य दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी लागणार अमाप पैसा, तेवढी बुद्धिम त्ता याचा कायमस्वरूपी आभाव, उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी जाणवणारा भांडवलाची कमतरता, आई-वडील दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी सतत घराबाहेर मोलमजुरी करण्यात व्यस्त या सर्व पार्श्वभूमीवर मिळालेले त्याच स्वरूपाचे, त्याच परिस्थितीमधील समदुःखी मित्र आणि संगत यातून रोज रडतखडत दारिद्र्यात जगण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था बाबतीत अतिशय अनादर आणि अज्ञान, कोणाचीही भीती नसणे, कसलीही तमा न बाळगणे, बेरडपणा अंगीकारणे यातून स्वतः बदल वाढलेला फाजील एकदाच काय ते मोठे कांड करून पैसा कसा मिळेल, या शोधात ही मंडळी असतात.विद्यार्थ्यांच्यात प्रबोधन आणि जागृती करण्याची गरज जन्मजात कोणीच गुन्हेगार नसतो, पण त्याच्या भोवतालचे वातावरण आणि त्याला लहानपणापासून आजूबाजूला दिसलेल्या चांगल्या-वाईट घटना, संस्कार, संगत यातून तो घडतो किंवा बिघडतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा गुन्हेगारी वृत्तीचा बालवर्ग अथवा तरुणवर्ग लहानाचा मोठा होतोय, त्या त्या ठिकाणी समुपदेशनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवणे आवश्यक आहे. गुन्हेगारांचा अड्डा बनलेला परिसर, तेथील रहिवासी परिसर, त्या त्या ठिकाणच्या शाळा, कॉलेज, क्लास त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांना देखील साबध करणे, त्यांच्यात प्रबोधन आणि जागृती करणे आवश्यक आहे.आत्मविश्वास या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त करीत आहे. त्यामुळे अशा युवकांना प्रबोधन करणे अत्यावश्यक आहे. तरुण मुले जास्तीत जास्त गुन्हेगाराकडे वळत आहेत. त्यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments

|