Header Ads Widget


ट्रॅक्टर ट्रली मध्ये गावठी दारू नेण्याची पहीली घटणा असुन पोलीस प्रशासनास तुरी देऊन अवैध मार्गाने दारु तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे आवाहन...

 




 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादाकडून कलसाडी गावाच्या रस्ताने ट्राली मध्दे बनावटी व्हिस्की दारुचे खोके खाली ठेवत त्यावर सिमेंटचे ब्लाँक रचुन विना परवाना अवैध गावठी दारू नेत असताना पिंगाणे गावाच्या शिवारात कलसाडी गावाच्या वळणावर भरधाव वेगाने वाहन नेत असताना ट्रॅक्टरचे हायड्रोलीक तुटत  चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक्टर - ट्राँली पटल्याने वाहन चालक ट्रॅक्टरच्या खाली आल्याने डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्राँली मधील सिमेंट ब्लाँक व दारुचे आठ-दहा लाख रुपये किमतीचे खोके अस्ताव्यस्त पडलेले पाहुन अनेकांनी दारुचे खोके पळवुन लावले आहे सदरची घटणा रविवार सांयंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास घडली आहे. घटणीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व कर्मचारी घटणा स्थळी पोहचले होते. रात्री उशिरापर्यंत घटणेची पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद करण्यात आली आहे ट्रॅक्टर ट्रली मध्ये गावठी दारू नेण्याची पहीली घटणा असुन पोलीस प्रशासनास तुरी देऊन अवैध मार्गाने दारु तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे आवाहन आहे. मिळालेली माहिती अशी की, ट्रक्टर ट्राँली मध्ये बनावट व्हिस्की दारु बाटली मध्ये भरुन खोक्यात पॅक करुन ठेवले होते एका बाँक्स मध्दे ४८ क्वार्टर बाँटल अशे ४०० बाँक्स बाजार भाव सुमारे आठ दहा लाख रुपये किमतीचे दारुचे बाँक्स त्याचावर सिमेंटचे ब्लाँक रचुन ट्राली मध्ये ठेवत पिंगाणे मार्ग कलसाडी कडे नेत असता पिंगाणे गाव शिवारात कलसाडी वळण रस्ता लगत यादगार मटण शाँप यांचे व तिखोरा गावातील विनोद पाटील यांच्या शेतालगत ट्क्टरचे हायड्रोलीक झोल गेल्याने ट्क्टर ट्राली पलटी झाले त्यात ट्क्टर चालक वाहाणाच्या खाली सापडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा पर्यंत चालकाचे नाव कळाले नाही. रविवार सांयंकाळी साडेसहा सात दरम्यान ही घटणा घडल्याचे बोलले जात आहे. ट्क्टर ट्राली पलटी होताच जोरदार धमाक्याचा आवाज होताच सांयंकाळी तिखोरा पिंगाणे गावातील शेतकरी शेतमजूर घटणा स्थळी धावत गेले घटणा स्थळी पोहचल्यावर व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी वाहन थांबवत खोक्यात काय आहे याचे माहीती घेतली तर बनावट व्हिस्की बाँटलचे बॉक्स असल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी बाँक्स घेत पळ काढला आहे. या घटणेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलीस कर्मचारी घटणा स्थळी पोहचुन रहदारीस मार्ग मोकळा करीत दारुचे बाँक्स गोळा केले आहे. 

    ऐन सांयंकाळाचा सुमारास पोलीसांना तुरी देत ट्क्टर ट्राली मध्ये बनावट व्हिस्की दारु चोरट्या मार्गाने नेण्याची हिम्मत केली. ट्क्टर ट्रालीचा मालक कोण? वाहनास नंबर प्दालेट का नाही? दारुचा मालक कोण आहे याचा मागे कोण कोणाचा सहकार्य याचा तपास पोलीस प्रशासनकडे आवाहन उभे ठाकले आहे.

Post a Comment

0 Comments

|