Header Ads Widget


शहादा शहरातील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुला जवळ संरक्षण भिंतीला लागून झाडाच्या सावलीत रोज अनेक गायी आसरा घेत आहेत..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा सध्या राज्यात अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून उष्णतेच्या पारा ४३ डिग्री सेल्सिअस व त्यापेक्षा अधिक पोहोचला आहे.उष्णतेने सारेच हैराण झाले आहे.पक्षांची किलबिलाट कमी झाली आहे तर गुरांना देखील सावलीच्या आसरा घ्यावा लागत आहे.शहादा शहरातील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुला जवळ संरक्षण भिंतीला लागून झाडाच्या सावलीत रोज अनेक गायी आसरा घेत आहेत.विशेष म्हणजे या गाईंची पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था संकुलातर्फे केली जात असल्याने कौतुक केले जात आहे.

       गेल्या दोन महिन्यात विविध सेवाभावी संस्था संघटना तसेच अखिल भारतीय भक्तीपरिवार तर्फे शहादा शहर सह परिसरातील गौशाळांना वेळोवेळी चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.पक्ष्यांना वाचवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली जात आहे.शेतात काम करणारे शेतमजूर दुपारी झाडांच्या सावलीत विश्रांती घेत असतात.

        कर्म साक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाच्या संरक्षण भिंतीला लागून रोज चार ते पाच गाई झाडांच्या सावलीत आश्रय घेतात.उशिरा सायंकाळपर्यंत बसून राहतात.त्यामुळे त्यांना चारा व पाणी आवश्यक असल्याने सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव वर्षा जाधव यांनी आपल्या परिवाराकडून त्यांच्या चारा व पाण्याची सोय केली आहे शिवाय त्यांची देखरेख देखील केली जाते.या माध्यमातून गाईंची अर्थात गोमातांची सेवा करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून आमचे भाग्य असल्याचे वर्षा जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

|