Header Ads Widget


प्रशासनाच्या गाफीलपणामुळे खडवलीच्या नदीवर पर्यटकांमध्ये हाणामाऱ्या पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप


 प्रतिनिधी/ विशाल कुरकुटे:पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून खडवलीच्या भातसा नदीला मुंबई उपनगरातील पर्यटक पसंती देत असले तरी हुल्ड्ड बाजी करणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या ठिकाणी येणारे पर्यटक आपसापसामध्ये मध्य प्राशन केल्यानंतर हमरी तुमरी हाणामाऱ्या होत आहेत दिनांक 24 मे रोजी अशाच काही पर्यटकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे कोणत्याच बंदोबस्त नसल्याने स्थानिक आणि याबाबत नाराजी व्यक्त केली आहे विशेष बाब म्हणजे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तहसीलदार उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकारी प्रशासन यांच्याकडून कोणत्याच प्रकारे या ठिकाणी उपाययोजना केल्या नसल्याने मुंबई उपनगरातून येणाऱ्या पर्यटकांची मुजोरी वाढली आहे स्थानिक हॉटेल मालक अशा हाणामारी करणाऱ्या पर्यटकांना समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांनाच दमबाजी करण्याचा प्रकार ते करत आहेत अपुरा पोलीस बंदोबस्त हे नेहमीच बाब ह्या नदीवर दिसून येत असल्याने दिवसेंदिस हाणामारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे त्यातच विशेष बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या घडवली स्थानकात उतरणाऱ्या या प्रवाशांच्याकडे बहुतांशी पर्यटक हे विना तिकीट प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे असे असतानाही खडवली स्थानकात तिकीट तपासणी नसल्याने त्यांचे प्रचंड फावले आहे.या नदीवर पर्यटकांना अटकाव करणारे कोणतेही सूचना फलक कुठेच लावलेले नाहीत त्यामुळे स्थानिक प्रशासन याबाबत काय करताय असा संवाद येथील या ठिकाणी सुज्ञ पर्यटकाकडून केला जात आहे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन उपायोजना का करत नाही असे सवाल या निमित्ताने काही जाणकार पर्यटकाने आपली प्रतिक्रिया देताना केला.रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी नदीवर होत असल्याने स्थानिक पोलीस स्टेशन कोणताच बंदोबस्त या ठिकाणी का वाढवत नाही असे सवाल यांनी निमित्ताने पुढे आला आहे लहान मुले स्त्रिया वृद्ध व्यक्ती हे सुद्धा या नदीवर येत असल्याने हाणामाऱ्या करणाऱ्या पर्यटकाकडून अशा लोकांना त्यांचा प्रचंड त्रास होत आहे याबाबतही पोलीस प्रशासन व महसूल विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात हुल्ड करणाऱ्या पर्यटकांचा व्यवस्थित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|