नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरात नवीन वसाहतींमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवर विद्युत तारांना अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम गेल्या चार-पाच दिवसापासून विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केल्याने सातत्याने खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा मुळे नागरिक हैराण झाले आहेत.मात्र वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरात ज्या भागात नवीन वसाहतींमध्ये शिवाय मोकळ्या जागा मुख्य रस्त्यांवर झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या.वाढलेल्या फांद्या विद्युत तारांमध्ये अडकलेल्या होत्या त्यामुळे हवेमुळे व वादळामुळे विद्युत पुरवठा खंडित होत होता.पावसाळ्यात त्याचा त्रास होऊ नये म्हणून विद्युत वितरण विभागातर्फे झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे.
काही झाडांच्या फांद्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत सर्व पूर्ण विद्युत तारांना फांद्यांमध्ये अडकून गेलेले आहेत.सुरुवातीला ज्या मोठ्या फांद्या होत्या जिथे मोठ्या प्रमाणात अधिक त्रास होता त्या तोडण्यात आल्या नंतर इतर फांद्या तोडल्या जात आहेत.थोडे जरी वादळ आले तरी शहादा शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा बंद होत असतो.पावसाळ्यात त्याचा त्रास होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांमार्फत फांद्या तोडल्या जात आहेत.
0 Comments