Header Ads Widget


माध्यमिक विद्यालय दुधाळे इ. १० वी परीक्षेचा १००% निकाल लावून उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली !

नंदुरबार: येथील  शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास संस्था वाघाळे संचलित संस्थेच्या माध्यमिक विद्यालय दुधाळे या विद्याशाखेतील इ. १० वी चा निकाल ऑनलाईन पद्धतीने सोमवार,दि. २७/०५/२०२४ रोजी दुपारी ठीक १:०० वा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला. तरी सदर निकालात आपल्या विद्याशाखेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. 


सदर परीक्षेत चि. किरण शरद हेतम (प्रथम,)  २)अक्षरा सूरेश सोनवणे (दुसरा)३)शितल अरविंद वळवी (तिसरी)४) संध्या संजु गावित (चौथी) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण मिळवून   विद्यालयात  येण्याचा मान मिळविला आहे. 
एस्. एस्. सी. परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 24 विद्यार्थी प्रविष्ट होते.  तर सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा १००% निकाल लागला आहे. 
निकाल टक्केवारी :-
माध्यमिक विद्यालय दुधाळे शाळेचा निकाल :-  १००%
सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे  संस्थेचे अध्यक्ष दादा साहेब श्री. अशोक रामदास जी अहिरे उपाध्यक्ष दादासाहेब श्री. कमलेश अहिरे, संस्था कार्याध्यक्ष श्री तुषार दादा अहिरे मानद सचिव आबासाहेब श्री गंगाराम गावित साहेब , संस्थेचे संचालक तथा शालेय समिती  सर्व सन्मा. संचालक महोदय यांनी अभिनंदन केले आहे. 
मुख्याध्यापक,
प्राथमिक माध्यमिक विद्यालय दुधाळे ता जि नंदुरबार




Post a Comment

0 Comments

|