Header Ads Widget


तापमान ४३ अंशाच्या वरती गेल्याने उष्णतेच्या जन जीवनावर परिणाम झाला असून दुपारी रस्ते ऊस पडायला लागले ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहर सह परिसरात गेल्या दोन दिवसापासून पुन्हा उष्णतेची लाट सुरू झाली आहे. तापमान ४३ अंशाच्या वरती गेल्याने उष्णतेच्या जन जीवनावर परिणाम झाला असून दुपारी रस्ते ऊस पडायला लागले आहेत.सकाळी आठ वाजेपासून तापमानाच्या पारा वाढायला सुरुवात होतो.साधारणतः सकाळपासूनच तापमान ३० अंशाचा वरती असते.दुपारी एक वाजे नंतर तापमानात कमालीची वाढ होते.उशिरा सायंकाळी सहा वाजेपर्यंत गरम हवा सुरू राहते.त्यामुळे नागरिक घरातच राहणे पसंत करतात.शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच बाजारपेठेत भाजी मार्केट बसस्थानक परिसर शासकीय विश्राम गृह परिसर भगवा चौक परिसरात शुकशुकाट जाणवतो.रस्ते ओस पडलेले असतात.नवीन वसाहतींमध्ये शुकशुकाट असतो.नागरिक सकाळीच आपली कामे आटोपतात.शेतमजूर देखील दुपारी बारा वाजेपर्यंत कामे करून चार वाजेपर्यंत विश्रांती करतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.शासकीय विश्रामगृह परिसर व भाजी मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी सकाळीचे मोठ्या प्रमाणे गर्दी होते. शहरात रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे तसेच हात गाडीवाले दुपारी उष्ण वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी सावलीच्या आश्रय घेतात.मोठ्या छत्र्या लावून बचाव करतात.तापमानात वाढ झाल्याने दादा शहरात हितपेय विक्री करणाऱ्यांच्या दुकानावर नागरिकांची गर्दी होत असते.एकंदरीत तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण झालेले आहे.

Post a Comment

0 Comments

|