Header Ads Widget


मोकाट गुरांमुळे नागरिक हैराण झाले असून नगरपालिका प्रशासनाने याबाबतीत पूर्णतः दुर्लक्ष केले असून मोकाट गुरांच्या त्वरित बंदोबस्त करावा..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट गुरांमुळे नागरिक हैराण झाले असून नगरपालिका प्रशासनाने याबाबतीत पूर्णतः दुर्लक्ष केले असून मोकाट गुरांच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.दिनांक १८ मे रोजी रात्री सात वाजता नगरपालिका जवळ मोकाट गुरांची रस्त्यावर तसेच चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.त्यातच दोन बलाढ्य सांडमध्ये चांगली झुंज लागली होती.त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना व वाहनधारकांना तसेच व्यावसायिकांना आपला जीव मुठीत धरून इतरस्ता पळावे लागले.हात गाडीवाल्यांना आपल्या हात गाड्या त्यांची झुंज पाहून बाजूला करावे लागल्या.उपस्थित नागरिकांनी हातात काठ्या घेऊन त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची झुंज थांबत नव्हती.रोज मोकाट गुरे मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी चौकांमध्ये दहा ते पंधराच्या संख्येने बसलेले असतात.रहदारीला अडथळा निर्माण होतो.नाईलाजाने वाहनधारकांना बाजूने वाहने न्यावी लागतात अशी परिस्थिती निर्माण होते.कुणीही त्या गुरांना बाजूला करायला येत नाहीत.ज्यांची गुरे आहेत ते कधीच आपल्या गुरांना पाहायला देखील येत नाहीत.गेल्या वर्षी मोकाट अशा मोठ्या सांडणे एका वृद्धाला उचलून फेकल्याने त्याला जीव गमावा लागला होता.अनेकांना गुरांनी जखमी केले आहेत.आता दिवसेंदिवस मोकाट गुरांची संख्या वाढत आहे.कोणत्याही प्रकारची निर्बंध नाहीत.नगरपालिका प्रशासनाने याबाबतीत कोणतीही कारवाई केली नसल्याने ज्यांची गुरे आहेत त्यांचे मालक बिनधास्त असतात.नगरपालिका प्रशासनाने अशा मोकाट गुरांच्या बंदोबस्त करून त्यांच्या मालकांच्या शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी.मोकाट गुरे नेमकी कोणाची?किती दिवसापासून त्यांनी गुरे मोकाट सोडली आहे? अशा मोकाट गुरांना ताब्यात घेऊन कुणीही मालक येत नसेल तर त्यांच्या लिलाव करून मोकळ्या व्हावे अशी मागणी नागरिकांची आहे.

Post a Comment

0 Comments

|