Header Ads Widget


आगोदर राष्ट्रहित महत्त्वाचे मग धार्मिक कार्यक्रम; 87 वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:
घरात भागवत कथेचा धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाही राष्ट्रहित महत्त्वाचे हा विचार करून येथील काशिनाथ छगन पाटील यांनी आज सकाळी शिंदखेडा तालुक्यातील आशिषपुर या आपल्या मुळ गावी सहपरिवार जावून मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्याची 87 वर्षीय वयोवृद्ध आई मोतनबेन छगन पाटील यांनीही मतदान केले.आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया झाली. त्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते बाहेरगावी गेलेल्यानाचा शोध घेत मतदान होणेसाठी प्रयत्न करीत होते. तर शासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध प्रयत्न सुरू होते. बुथ पातळीवर मतदान स्लिप देण्याचे नियोजन केले. पण ते शंभर टक्के यशस्वी झाले नाही. कारण संबंधित मतदार जर तेथे राहत नसेल किंवा काही कारणास्तव घर बंद असेल तर स्लिप देण्यासाठी पुनर्प्रयत्न झालेच नाही. अश्याही परिस्थितीत काही सुज्ञ मतदार राष्ट्रहिताचा विचार करून स्वखर्चाने जात आपला मतदानाचा हक्क बजावत असल्याचे दिसून आले. येथील डोंगरगाव रोडवरील शांतीविहार येथे आशिषपुर ता. शिंदखेडा, जि. धुळे येथील काशिनाथ छगन पाटील हे काही वर्षांपासून रहायला आले आहेत. त्यांच्याकडे कालपासून भागवत कथा सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. भागवत कथाकार वेदमूर्ती अविनाशजी जोशी यांनी काल कथेचे निरूपण करताना राष्ट्रहिताचे काही मौलिक विचार मांडले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित यजमनासह भाविकांना राष्ट्रहित जपले तरच आपल्यासह देशाचा विकास आणि उत्कर्ष होवू शकतो. त्यासाठी मतदान ही पहिली पायरी असल्याचे विषद केले होते. तसेच काशिनाथ पाटील परिवार हे मूळचे शिंदखेडा तालुक्यातील असल्याने सकाळी लवकर जावून मतदान करा त्यानंतरच सकाळची भागवत आरती होईल असे जाहीर केले. वेदमूर्ती अविनाशजी जोशी यांच्या प्रेरणेतून काशिनाथ पाटील यांनी त्यांच्या परिवारासह त्यांच्याकडे शिंदखेडा तालुक्यातून आलेल्या सर्व आप्तेष्टांनी सकाळी आशिषपुर या आपल्या मूळ गावी जावून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांची 87 वर्षी आई मोतनबेन छगन पाटील यांनी सुद्धा त्यांच्या सोबत जात मतदानचे पवित्र कर्तव्य बजावले. त्यानंतर हा सर्व परिवार पुन्हा शहादा येथे येत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत पूजा अर्चना केली. त्यांच्या या राष्ट्रहित जोपासण्याचा व लोकशाहीचा आदर करण्याच्या प्रक्रियेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

|