Header Ads Widget


खरीप हंगाम पूर्व गाव बैठक बोलवण्यात येऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक आयोजित...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:वडगाव (ता. शहादा) येथे शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मार्फत खरीप हंगाम पूर्व गाव बैठक बोलवण्यात येऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिका मार्फत खरीप हंगामातील तृणधान्य, कडधान्य पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे प्रात्यक्षिकातून सांगितले. जसे आपण लहान मुलांवर संस्कार करतो किंवा निरोगीसाठी लस देतो त्याचप्रमाणे पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करणे उत्तम आहे व उपयोगाचे आहे त्यामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्राचे बचत होते. दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होऊन किड व रोगा पासुन मुक्त ठेवण्याचे काम बिज प्रक्रिया मुळे होते तसेच मंडळ कृषि अधिकारी मंदाणा मनोज खैरनार यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रत्यक्षिक अंतर्गत संत तुकाराम महाराज यांनी तर म्हटले आहे शुद्ध बीजा पोटी पळे रसाळ गोमती घराचे किंवा बाजारातून आणलेले बियाणे उगवले नाही तर आपला खर्च व संपुर्ण एक हंगाम वाया जातो कधी कधी आपल्यावर दुबार पेरणीची वेळ येते अशी परिस्थितीत आपल्यावर येऊ नये म्हणून बियाणांची उगवण क्षमता तपासणी करुन जर बियाणे ७० टक्के च्या वर ऊगवण क्षमता असेल तरच पेरणी करावे, तसेच कृषि विभागा मार्फत माग्रारोहयो फळबाग लागवड, महाडीबीटी योजना ,ठिंबक सिंचन योजना, पी एम किसान योजना, पिक प्रत्याक्षिके अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका ,प्रधानमंत्री सूक्ष्मअन्न प्रक्रिया योजना, आपत्कालीन पीक नियोजन, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, मूलस्थानी साधारण बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे, वडगावचे सरपंच दिनेश पावरा ,पोलीस पाटील ओकेश पावरा, उपसरपंच विजय सोनवणे , भिका ठाकरे, लगन पावरा, ग्रामपंचायत सदस्य पवन सूळे ,अन्ना वळवी संतोष पावरा आदी शेतकरी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

|