Header Ads Widget


म्हाळसादेवी मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे सव्वा लाख मंत्र जप भाविकांमार्फत संपन्न...

   


       नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील म्हाळसादेवी मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे सव्वा लाख मंत्र जप भाविकांमार्फत संपन्न करण्यात आले.डोंगरगाव रोडवरील म्हाळसादेवी मंदिरात नेहमी भाविकांमार्फत व मंदिर सेवेकरी समितीमार्फत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. म्हाळसा मंदिरामध्ये परम पूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये दर शुक्रवारी श्री स्वामी समर्थ महाराज यांची साप्ताहिक आरती आयोजित करण्यात येते आणि यावेळी परिसरातील भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असतात. माऊलींच्या आदेशाने नुकताच सव्वा लाख श्री स्वामी समर्थ मंत्र जप करण्याच्या सूचना मिळाल्याने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मोहिदा येथील याद्निकी परिवार तुषार शर्मा, योगेश चौधरी , महाजन सर यांच्यामार्फत सेवा रुजू करण्यात आली. सुरुवातीला तुषार शर्मा यांनी श्री स्वामी समर्थ जप व श्री कालभैरव अष्टक याचे महत्त्व सर्व उपस्थित भाविकांना सांगितले व आध्यात्मिक मार्गाला जूडल्याने बऱ्याचश्या अडचणी दूर होतात. अध्यात्म ही भारतीय संस्कृती जोपासणारी एक महत्त्वपूर्ण बाब आहे आणि म्हणून या पृथ्वीतलावर भारताचे अस्तित्व हे एक वेगळेच आहे. यानंतर श्री स्वामी समर्थांचे जवळपास सव्वा लाख मंत्र जपाचे सामूहिक पठण करण्यात आले. नंतर 200 कालभैरवाष्टक सामूहिक रित्या म्हणण्यात आले. स्वामी समर्थ महाराजांच्या जप व कालभैरवाष्टक मंत्राने संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणाने नाहून निघाला होता . यावेळी उपस्थित महिला व पुरुष वर्ग मंत्रमुग्ध होवून जप व कालभैरवाष्टक याचे पठण करत होते. यामुळे संपूर्ण परिसरात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामूहिक पठणात महिला वर्गाची उपस्थिती मोठी होती तर महिला व पुरुष मिळून 90 सेवेकरी यांनी या सामूहिक सेवेचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे डॉ. संगीता कलाल, विद्या सोनवणे, सोनाली जयस्वाल, मनोज जयस्वाल, प्रा. गणेश सोनवणे, गणेश केशवराव सोनवणे, प्रा. बाळू मराठे, स्वप्निल पाटील , गिरीश जावरे, डॉ लक्ष्मण सोनार, वकील पाटील, निलेश सोनार , निलेश शिंपी , डॉ. विजय कलाल, विलास जावरे, यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|