Header Ads Widget


(कै.) डॉ. विश्राम काका पाटील शैक्षणिक संकुलातील शेठ व्ही.के.शाह विद्या मंदीरातील शिक्षकांचे अथक परिश्रम, विद्यार्थी यांचे परीक्षेत यश


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
शहादा येथील शेठ व्ही. के. शाह विद्या मंदिरातील इयत्ता दहावीचा परीक्षेला ४३६ विद्यार्थी प्रविष्ठ होते पैकी ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा ९६:३३ टक्के निकाल लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आय. डी. पटेल यांनी दिली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन वनश्री मोतीलाल पाटील यांनी कौतुक केले आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांची मार्च २०२४ मध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत ४३६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते. त्यापैकी ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील ४० विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. शाळेत प्रथम तनिष्क चंद्रशेखर सिसोदे याला ४७७ गुण ९५:४० टक्के मिळाले आहेत. द्वितीय तूषार पंढरीनाथ वाघ या ४७३ गुण मिळाले असून ९५:२० टक्के मिळाले आहे. तृतीय क्रमांक अथर्व जितेंद्र निकुम यास ४७१ गुण घेऊन ९४:८० टक्के मिळवले आहेत.


(कै.) डॉ. विश्राम काका पाटील शैक्षणिक संकुलातील शेठ व्ही.के.शाह विद्या मंदीरातील शिक्षकांचे अथक परिश्रम, विद्यार्थी यांचे परीक्षा बाबत असलेले सकारात्मक प्रतिसाद असल्याने शाळेने ९५ टक्के पेक्षा जास्त निकाल लागण्याची यशस्वी परंपरा कायम राखण्यात यश मिळविले आहे. असे मुख्याध्यापक आय. डी. पटेल यांनी व्यक्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन वनश्री मोतीलाल पाटील, व्हा.चेअरमन हिरालाल पाटील, संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील,संचालक मंडळ यांच्यासह मुख्याध्यापक आय. डी. पटेल, उपमुख्याध्यापक सुरेश जाधव, पर्यवेक्षक विलास जावरे, चंद्रकांत पाटील, कार्यालयीन प्रमुख टिला पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कोतुक केले आहे.


Post a Comment

0 Comments

|